Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर नवीन रॅलीसाठी सज्ज, फायद्याची बातमी आली, तेजीचे संकेत

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज या मुकेश अंबानी यांच्या फ्लॅगशिप कंपनीसाठी (Reliance Industries Share Price) अमेरिकेतून एक सकारात्मक बातमी आली आहे. या बातमीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 1 टक्के वाढीसह 3005 रुपये किमतीवर पोहचला होता. आज मात्र रिलायन्स स्टॉकमध्ये किंचित घसरण पहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक एका नवीन रॅलीसाठी सज्ज झाला आहे. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
कारण नुकताच व्हेनेझुएला देशातून रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीला कच्च्या तेलाची आयात पुन्हा सुरू करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. रिलायन्स कंपनीला अमेरिकेच्या आर्थिक निर्बंधांना न जुमानता व्हेनेझुएलामधून तेलाची आयात पुन्हा सुरू करण्यासाठी मान्यता मिळवली आहे. ही बातमी कंपनीसाठी सकारात्मक ठरली आहे. आज गुरूवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक 0.57 टक्के घसरणीसह 2,974.35 रुपये किमतींवर ट्रेड करत आहे.
भारतातील सर्वात मोठी खाजगी रिफायनर कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने (RIL Share Price) व्हेनेझुएलातून कच्च्या तेलाची आयात करण्याची योजना आखली आहे. यूएस ट्रेझरीने या बातमीवर टिप्पणी करण्यास नकार दिला आहे. व्हेनेझुएला देशातून भारतात होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीत रिलायन्स कंपनीचा वाटा 90 टक्के आहे. अमेरिकेने मागील वर्षी दक्षिण अमेरिकन देशावर लादण्यात आलेले प्रतिबंध हटविले होते, त्यानंतर व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि विरोधकांनी मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांची हमी देण्याच्या करारावर स्वाक्षरी केली होती. मात्र करार करून सुध्दा त्यांनी अटींचा सन्मान न केल्यामुळे एप्रिल 2024 मध्ये त्यांच्यावर पुन्हा निर्बंध लादण्यात आले होते.
यामुळे अनेक तेल कंपन्याना व्हेनेझुएलासोबत व्यापार करण्यासाठी यूएस ट्रेझरी विभागाकडून परवानगी घ्यावी लागत आहे. रिलायन्स कंपनी व्यतिरिक्त ONGC या सरकारी मालकीच्या कंपनीने तसेच ONGC विदेश लिमिटेड कंपनीने व्हेनेझुएलामधून कच्चे तेल आयात करण्यासाठी सूट मिळावी असा अर्ज केला आहे. व्हेनेझुएला देशाची क्रूड ऑइल निर्यात जून 2024 मध्ये प्रति दिन 654,000 बॅरल होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Reliance Share Price NSE Live 25 July 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं