Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम होताच खरेदीला गर्दी, पटापट तुमच्या शहरातील नवे दर जाणून घ्या

Gold Rate Today | 2024 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आल्याने सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे स्वस्त दरात सोने खरेदी करण्यासाठी दागिन्यांच्या दुकानात लोकांची गर्दी होऊ लागली आहे. लग्नासाठी लोकांनी सोन्याची खरेदी सुरू केली आहे.
आज या लेखात पुणे, मुंबई आणि नाशिक शहरातील 24, 22 आणि 18 कॅरेटचे दर देण्यात आले आहेत. मात्र विविध शहरात या दरांमध्ये किंचित फरक असू शकतो.
दागिन्यांच्या दुकानात लोकांच्या रांगा
सोन्याची मागणी वाढल्याने किमतींवरील सीमा शुल्काचा निर्णय मागे घेतला जाऊ शकतो, अशी भीतीही काही लोकांना सतावत असल्याचे सोने-चांदी व्यापाऱ्यांनी सांगितले. भारत हा सोन्याचा जगातील दुसरा सर्वात मोठा ग्राहक आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोन्याच्या कमी किमतीचा फायदा घेण्यासाठी मंगळवारी सायंकाळपासूनच दागिन्यांच्या दुकानात लोक येऊ लागले.
अर्थसंकल्पातील घोषणेनंतर सोन्याचे दर प्रति ग्रॅम 74000 रुपयांच्या विक्रमी पातळीवरून 70,000 च्या खाली आले आहेत. मुंबई-पुण्यासह सर्व प्रमुख शहरात 24 कॅरेट सोन्याचा भाव 69,950 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 64,150 रुपये आहे.
सराफा व्यापारी खूश
सोन्या-चांदीला प्रचंड मागणी असल्याने ज्वेलर्सनी कारागिरांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. कारण, कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे दैनंदिन मागणीत 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदाच्या सणासुदीच्या काळात दागिन्यांची विक्री चांगली होईल, अशी आशा सोने-चांदी व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
मुंबईतील सोने आणि हिरे बाजार झवेरी बाजारातील एका किरकोळ विक्रेत्याने सांगितले की, अचानक वाढलेल्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आम्ही आमच्या कारागिरांच्या (सोन्याच्या कारागिरांच्या) पुढील सात दिवसांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत.
सोन्यावर अॅडव्हान्स बुकिंग स्कीम
मंगळवारी सोन्याचा भाव 72,609 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, तो बुधवारी 69,194 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. सरकारने अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क 15 टक्क्यांवरून 6 टक्क्यांवर आणल्यानंतर 3,415 रुपयांची घसरण झाली.
Gold Rate Today Pune
22 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 64,000 रुपये आहे.
24 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 69,820 रुपये आहे.
18 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 52,370 रुपये आहे.
Gold Rate Today Mumbai
22 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 64,000 रुपये आहे.
24 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 69,820 रुपये आहे.
18 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 52,370 रुपये आहे.
Gold Rate Today Nashik
22 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 64,030 रुपये आहे.
24 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 69,850 रुपये आहे.
18 कॅरेट सोन्याचा भाव – नाशिक
आज नाशिकमध्ये 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 52,400 रुपये आहे.
सोने-चांदी च्या खरेदीसंदर्भात परिस्थिती अशी आहे की, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये होणाऱ्या लग्नासाठी ग्राहक आधीच दागिने मागवत आहेत. धनतेरस आणि दिवाळी सणासाठी काही जण ऑर्डर देत आहेत. त्याचबरोबर ज्वेलर्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सोन्यावर अॅडव्हान्स बुकिंग स्कीम आणत आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : Gold Rate Today Updates check details 25 July 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं