आरे कॉलनी: आता वृक्षरोपण करण्यापेक्षा, झाडांची बेसुमार कत्तल होताना कुठे होते? स्थानिकांचा सवाल

मुंबई : आदित्य ठाकरे यांच्याउपस्थितीत १,१०० एकाच वेळी अकराशे रोपे लावली. या वेळी बोलताना आदित्य म्हणाले, आज मी लावलेले हे विकासाचे झाड आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी आहे. सर्वच राजकीय पक्षांनी त्यासाठी एकत्र आले पाहिजे. तसेच आमचे खत सगळीकडे चांगले आहे. आधी पावसाचे इनकमिंग होऊ दे, असेही ठाकरे म्हणाले.
जंगलात शहरं उभारण्यापेक्षा सिमेंट-काँक्रीटच्या जंगलात हिरवळ उभी करणं मानवतेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, सिमेंटच्या टॉवरपेक्षा झाडांचे टॉवर उभे करा, असे प्रतिपादन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. वसंत लॉनतर्फे अंधेरी-मरोळ या ठिकाणी माजी नगरसेवक कमलेश राय यांच्या पुढाकाराने तब्बल ११०० रोपांची लागवड करण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ आदित्य ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आला. दरम्यान मरोळ आरे कॉलनीत सकाळी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या स्थानिक नागरीकांनी आणि समाज सेवी संस्थांनी या निवडणुकीच्या काळात येणाऱ्या वृक्ष रोपणाच्या कार्यक्रमांवर संताप व्यक्त केला आहे. कारण आरे मधील वास्तव त्यांनी उघड्या डोळ्याने पाहिलं आहे.
‘मेट्रो’साठी आतापर्यंत मुंबईतील तब्बल ६३०३ झाडांची कत्तल करण्यात आली आहे. यामध्ये तोडण्याची मंजुरी घेतलेल्या २८०१ झाडांव्यतिरिक्त आणखी ३५०३ झाडे तोडण्यात आली आहेत. पालिका प्रशासनाच्या या धोरणाविरोधात ही वृक्ष नष्ट करण्याची प्रक्रिया मागील ४-५ वर्षांपासून सुरु आहे. बहुमताने सत्तेत असून देखील यात शिवसेना हतबल असल्याचं पाहायला मिळत आहे.
‘एमएमआरसी’कडून कुलाबा-वांद्रे-सीप्झ अशा ३२.५ कि.मी. ‘मेट्रो-३’ मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे, मात्र या मार्गात येणाऱया झाडांची मोठय़ा प्रमाणावर कत्तल सुरू आहे. प्रकल्पाच्या सुरुवातीला पालिकेकडून फक्त २८०१ झाडे तोडण्याची मंजुरी घेण्यात आली. मात्र त्यानंतर ‘मेट्रो’कडून वेळोवेळी कामासाठी झाडे तोडण्याची निकड व्यक्त करून मंजुरी मिळवण्यात येते. त्यामुळे अशी अतिरिक्त झाडे तोडल्याचा आकडा तब्बल ३५०३ वर गेला आहे.
मे २०१७ मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘मेट्रो’ने पालिकेकडून २८०१ झाडे तोडण्यासाठी मंजुरी मिळवली. त्यानंतर ‘मेट्रो’च्या १५ स्थानकांसाठी २१४ झाडे तोडण्यात आली. आरे इलेक्ट्रिक टॉवर शिफिंगसाठी १३७, आरे कारशेडसाठी ३०७, यार्डसाठी ५४ अशी झाडे तोडण्यात आली. यानुसार मंजुरी घेतलेली – २८०१, अतिरिक्त – ३४२६ तर मुंबई सेंट्रल येथील आणखी ७६ अशी मिळून ६३०३ झाडे आतापर्यंत तोडण्यात आली.
सरकारच्या वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत मुंबईत प्रतिवर्षी ६,००० झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. परंतु यामध्ये लावलेली किती झाडे जगतात, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. ‘वन’ धोरणानुसार लोकवस्तीच्या ३५ टक्के भाग हा झाडांनी व्यापलेला असावा. मात्र मुंबईतील हे प्रमाण केवळ २० टक्के असल्याचे सिद्ध झालं आहे. मुंबईच्या दीड कोटी लोकसंख्येचा विचार करता मुंबईत असलेल्या २९७५२२८ झाडांनुसार पाच माणसांमागे फक्त एक झाड आहे. कॅनडामध्ये हेच प्रमाण प्रतिमाणसामागे – ८९५३ झाडे, ब्राझील – १२९३, चीन – ११०२ असे प्रमाण आहे. त्यामुळे या वृक्षतोडीविरोधात स्थानिकांसह अनेक पर्यावरणवादी संस्थांनी आक्षेप घेतला होता, तर स्थानिक नागरिकांनी मोर्चे काढले होते.
दरम्यान याच ‘सेव्ह आरे’ अभियानातंर्गत अनेक महिलांनी देखील प्रशासनाची त्यांच्या समोरच खरडपट्टी काढली होती आणि त्याची आदित्य ठाकरे यांना जाणीव देखील नसावी. स्थानिकांच्या संतप्त भावना त्यांनी आधी अशाच सार्वजनिक पद्धतीने समजून घेतल्या असत्या तर ते तिथे ५ मिनिट देखील उभे राहिले नसते हे वास्तव आहे. त्याचाच पुरावा खाली देत आहोत ज्यामध्ये आरे कॉलनीतील जंगलातील वृक्षांच्या बेसुमार कत्तलीवरून एका महिलेले मुंबई पालिका आणि एमएमआरसीएल’च्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले होते. कारण काल आदित्य ठाकरे यांच्या आजूबाजूला हारतुरे घेऊन मिरवणारे पदाधिकारी आणि स्थानिक आमदार व नगरसेवक ‘सेव्ह आरे’ अभियानाच्यावेळी कुठे गायब होते हे स्थानिकांना चांगलंच ठाऊक आहे.
दरम्यान याच ‘सेव्ह आरे’ अभियानातंर्गत अनेक महिलांनी देखील प्रशासनाची त्यांच्या समोरच खरडपट्टी काढली होती आणि त्याची आदित्य ठाकरे यांना जाणीव देखील नसावी. स्थानिकांच्या संतप्त भावना त्यांनी आधी अशाच सार्वजनिक पद्धतीने समजून घेतल्या असत्या तर ते तिथे ५ मिनिट देखील उभे राहिले नसते हे वास्तव आहे. त्याचाच पुरावा खाली देत आहोत ज्यामध्ये आरे कॉलनीतील जंगलातील वृक्षांच्या बेसुमार कत्तलीवरून एका महिलेले मुंबई पालिका आणि एमएमआरसीएल’च्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले होते.
#VIDEO : हाच तो पुरावा
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं