बिग बॉस मराठी २ : आला रे आला 'अभिजीत बिचुकले' आला; आज बिग बॉसमध्ये परतणार

मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरातून काल माधव देवचके बाहेर पडला. त्याला दिलेल्या विशेष अधिकाराने त्याने नेहाला पुढील आठवड्यासाठी सेफ केले. माधवच्या जाण्याने नेहा आणि शिवानीला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या जाण्याने आता नेहा आणि शिवानीची काय योजना असेल? याकडे सर्वांचे लक्ष आहेच. मात्र ज्या क्षणाची प्रेक्षक वाट बघत होते तो क्षण आज पाहायला मिळणार आहे.
आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अभिजीत बिचुकलेंची एंट्री होणार आहे. ‘अगर मैने एकबार कमिटमेंट करली तो मै खुदाकी भी नही सुनता’ या शब्दांत अभिजीत बिचूकलेंनी घरामध्ये एंट्री घेतली आणि सर्व सदस्य आश्चर्यचकित झाले. अभिजीत बिचुकलेंच्या एंट्रीने घरातील समीकरणं कशी बदलणार हे पाहणे रंजक असणार आहे.
नुकत्याच झालेल्या विकेंडच्या डावामध्ये घरातील स्पर्धक माधव देवचकेला घरातून बाहेर पडावं लागलं. माधवच्या जाण्यामुळे घरातील अनेकांना धक्का बसला आहे. त्यातच नेहा आणि शिवानी प्रचंड दु:खी झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र या साऱ्यामध्ये घरातील सदस्यांना एक आनंदाची बातमी मिळणार आहे. कारण, घरातून बाहेर गेलेल्या अभिजीत बिचुकलेची घरात पुन्हा एण्ट्री होणार आहे.
बिग बॉसच्या घरातून बिचुकलेला २०१५मधील एका चेक बाऊन्स प्रकरणात अटक करण्यात आली . त्याला बिग बॉसच्या घरातून २१ जूनला सातारा पोलिसांनी अटक केली. या केसमध्ये २२ जूनला जामीनही मिळाला होता. पण, त्याच्या विरोधातील खंडणी प्रकरण समोर आले. त्यांनंतर बिचुकलेला साताऱ्याच्या प्रथम न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टाने त्याला दिलासा न दिल्याने त्याला तुरुंगात जावं लागले होते. अटक केल्यानंतर बिचुकलेने एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली होती की, मला बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर काढण्याचा हा कट होता. मी विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याने हा राजकीय कट आखण्यात आला असल्याचे त्याने सांगितले होते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं