My Gratuity Money | नोकरदारांना 5 वर्षांनंतर मिळते ग्रॅच्युइटी, पण त्यात नोटीस पीरियड विचारात घेते का?

My Gratuity Money | जर तुम्ही एखाद्या कंपनीत दीर्घकाळ चांगले काम करत असाल तर ती कंपनी तुम्हाला आपला निष्ठावान कर्मचारी समजते. आपल्या सर्वोत्तम सेवेसाठी कंपनीकडून बक्षीस रक्कम दिली जाते, ज्याला ग्रॅच्युइटी म्हणतात. साधारणत: ग्रॅच्युइटीसाठी नोकरीचा कालावधी 5 वर्षे असणे आवश्यक असते.
पण समजा एखाद्या कर्मचाऱ्याने 4 वर्षे 10 महिने काम केले, त्यानंतर त्याने 2 महिन्यांचा नोटीस पीरियड दिला, अशा परिस्थितीत त्याचा नोटीस पीरियड त्यात गणला जाईल का? जाणून घ्या काय म्हणतात नियम
नोकरी 5 वर्षांपेक्षा कमी असली तरी ग्रॅच्युईटी दिली जाईल
5 वर्षांच्या कामासाठी ग्रॅच्युइटीबाबत नियम आहे, पण जर एखाद्या कर्मचाऱ्याने कंपनीत 4 वर्ष 8 महिने काम केले असेल तर त्याला ग्रॅच्युइटीचा पात्र मानले जाते. अशापरिस्थितीत 4 वर्षे 8 महिन्यांचा कालावधी पूर्ण 5 वर्षे मानला जातो आणि त्याला 5 वर्षानुसार ग्रॅच्युइटीची रक्कम दिली जाते. परंतु जर त्याने 4 वर्ष 8 महिन्यांपेक्षा कमी काळ काम केले असेल तर त्याच्या नोकरीचा कालावधी 4 वर्षे म्हणून गणला जाईल आणि अशा परिस्थितीत त्याला ग्रॅच्युईटी मिळणार नाही.
नोटीस कालावधी देखील मोजला जातो
नियमानुसार नोकरीचा कालावधी मोजताना कर्मचाऱ्याचा नोटीस पीरियडही मोजला जातो कारण त्या काळातही कर्मचारी आपली सेवा कंपनीला देत असतो. अशा परिस्थितीत समजा तुम्ही एखाद्या कंपनीत साडेचार वर्षे म्हणजे 4 वर्षे 6 महिने काम केल्यानंतर राजीनामा दिला, पण राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यांचा नोटीस पीरियड दिला. अशावेळी तुमच्या नोकरीचा कालावधी 4 वर्ष 8 महिने म्हणून गणला जाईल. आणि ती 5 वर्षे मानून ग्रॅच्युइटीची रक्कम दिली जाईल.
या परिस्थितीत 5 वर्षांचा नियम नाही
ग्रॅच्युईटी अॅक्ट 1972 नुसार एखाद्या कर्मचाऱ्याचा अनपेक्षित मृत्यू झाला किंवा तो अपंग झाला आणि पुन्हा काम करू शकला नाही, तर ग्रॅच्युइटी देण्यासाठी त्याला 5 वर्षांच्या कामाचा नियम लागू होत नाही. अशा परिस्थितीत ग्रॅच्युइटीची रक्कम नॉमिनी किंवा अवलंबितव्यक्तीला दिली जाते. नोकरीत रुजू होताना फॉर्म एफ भरून तुम्ही तुमच्या ग्रॅच्युईटीच्या रकमेसाठी नॉमिनीचे नाव नोंदवू शकता.
News Title : My Gratuity Money Rules after 5 years check details 21 August 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं