Face Pack | जराही वेदना न होता चेहेऱ्यावरील बारीक केस होतील गायब; घरच्याघरी ट्राय करा हा खास फेसपॅक

Face Pack | हरमोर्न जसजसे बदलतात तसतसे महिलांच्या चेहऱ्यावर पिंपल्स किंवा केस येण्यास सुरुवात होते. चेहऱ्यावर गालावर किंवा ओठांच्या वर तसेच हनुवटीला केस येतात. हे केस चेहऱ्यावरून काढण्यासाठी महिला अनेक उपाय करतात. शक्यतो यामध्ये थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग केली जाते. मात्र असे करताना अनेक वेदना होतात.
या वेदना काहीवेळा सहन देखील होत नाहीत. तसेच चेहऱ्यावर वॅक्स करताना स्किन भाजण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहोत ज्याने तुमच्या स्किनला कोणतेही नुकसान न होता आणि वेदना न होता केस गायब होतील.
साहित्य
* पाव चमचा तुरटीची पावडर
* पाव चमचा कॉफी पावडर
* कोरफड
* लिंबाचा रस
* साखर पावडर
फेसपॅक बनवताना सर्वात आधी कॉफी, तुरटी, कोरफड, लिंबाचा रस आणि साखर पावडर एकत्र मिक्स करून घ्या. यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करू नका. लिंबू रस असल्याने त्यात पाणी टाकण्याची आवश्यकता नसते.
हा फेसपॅक तुम्ही चेहऱ्यावर अप्लाय करताना फक्त केस ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी लावा. साधारण अर्धा तास चेहऱ्यावर फेसपॅक तसाच राहू द्या. त्यानंतर ओल्या कापडाने केसच्या दिशेने आहे त्याच्या विरुद्ध दिशेने पुसून घ्या. असे केल्याने चेहऱ्यावरील केस निघून जातात.
प्रत्येकाची स्कीन वेगळी असते त्यानुसार प्रत्येकासाठी वेगळी ट्रीटमेंट करावी लागते. तुम्हाला पहिल्याच याच्यात केस निघत नसतील तर फेसपॅक रात्रभर चेहऱ्यावर लावून ठेवा. केसांवर हा पॅक लावल्यानंतर त्यावर एक ओले कापड देखील ठेवा. त्यानंतर सकाळी पाहिल्यावर तुम्हाला लक्षात येईल केस आपोआप गळून पडले आहेत.
या सिम्पल टिप्सने कोणत्याही वेदना न होता चेहऱ्यावरील केस सहज निघून जातील. यामुळे चेहऱ्याला कोणताही साईड इफेक्ट होत नाही. त्यामुळे थ्रेडिंग आणि वॅक्सिंगपेक्षा या टिप्स फॉलो करणे महत्त्वाचे आहे.
News Title : Face Pack for Face Hair Removing 01 August 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं