Credit Card Benefits | क्रेडिट कार्ड वापरण्याचे हे 6 फायदे तुम्हाला माहित आहेत का? पैशांनी कमवा पैसे

Credit Card Benefits | पैशांचं ट्रांजेक्शन करण्यासाठी आपल्याकडे क्रेडिट कार्ड असणे अत्यंत गरजेचे आहे. क्रेडिट कार्डमुळे तुम्ही केव्हाही आणि कुठेही पैशांची हेराफेरी करू शकता. त्याचबरोबर तुम्ही एखाद्या बँकेमध्ये लोन घेण्यासाठी जातात तेव्हा सर्वात आधी तुमची क्रेडिट कार्ड हिस्ट्री चेक केली जाते.
तुम्ही अमुक-तमुक दिवसांमध्ये किती वेळा क्रेडिट कार्डचा वापर केला आहे या सर्व गोष्टी तपासल्या जातात. तुम्ही जेवढ्या वेळात क्रेडिट कार्ड वापरणार तेवढ्या वेळा तुमची हिस्ट्री स्ट्राँग बनत जाणार. त्याचबरोबर क्रेडिट कार्ड ठेवण्याचे आणखीन कोण कोणते फायदे आहेत पाहूया.
1) रिवॉर्ड पॉईंट्स :
तुम्ही आत्तापर्यंत अनेकदा ऑनलाइन शॉपिंग केली असेल. ऑनलाइन शॉपिंग केल्यानंतर तुम्हाला एकदा तरी रिवॉर्ड पॉईंट्स मिळाले असतील. किंवा कॅश प्राईज, स्क्रॅच कुपन यांसारखं रिटर्न मिळालं असेल. परंतु जर तुम्ही क्रेडिट कार्डमार्फत शॉपिंग केली तर तुम्हाला अत्याधिक रिवॉर्ड पॉईंट्स प्राप्त होतील. तुम्ही जेवढी शॉपिंग कराल तेवढे रिवार्ड तुम्हाला मिळतील. प्रत्येक रिवार्ड पॉईंटची किंमत 25 पैशांपर्यंत असते. दरम्यान वेगवेगळ्या कंपनींच्या रिवॉर्डची किंमत देखील वेगवेगळी असते. या रिवॉर्डमार्फत तुम्हाला कॅश प्राईज जिंकता येतात सोबतच शॉपिंग वाउचर देखील मिळतात.
2) पैशांनी कमवा पैसे :
पैशांनीच पैसे कमवायचे असतील तर क्रेडिट कार्डने शॉपिंग करणे महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डमधून पेमेंट करता तेव्हा 30 ते 45 दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्हाला भरपूर वेळ मिळेल. या दिवसांमध्ये तुम्हाला त्या पैशांवर अधिक व्याज देखील मिळेल. या व्याजाच्या पैशांची तुम्ही सेविंग करू शकता किंवा छोटी एफडी देखील ओपन करू शकता.
3) पेमेंट करण्यासाठी मिळतो भरपूर वेळ :
जर तुम्ही कॅश पेमेंट किंवा ऑनलाइन पेमेंट करत असाल तर, तुमचे पैसे जागेवर कट होऊन जातात. परंतु क्रेडिट कार्डचा अथवा वेगवेगळ्या क्रेडिट कार्डचा वापर करून पेमेंट केल्याने तुम्हाला 30 ते 45 दिवस पैसे फेडण्यासाठी मिळतात.
4) इतरांपेक्षा कमी पैशांमध्ये खरेदी करा :
तुम्ही क्रेडिट कार्डमार्फत इतरांपेक्षा कमी पैशांमध्ये तुमच्या आवडीचा प्रॉडक्ट खरेदी करू शकता. यासाठी मीशो, मिंत्रा, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन यांसारख्या शॉपिंग अँपवर कायम सेल चालू असतात. ज्यामध्ये वेगवेगळ्या क्रेडिट कार्डने प्रॉडक्ट खरेदी केल्यास कॅशबॅक देखील मिळतो. जर तुम्ही क्रेडिट कार्डवाल्या डीलचा वापर केला तर तुम्हाला इतरांपेक्षा कमी पैशांमध्ये प्रॉडक्ट खरेदी करता येणार आहे.
5) एमर्जन्सीमध्ये क्रेडिट कार्ड करेल मदत :
समजा तुम्ही बाहेर असताना एखाद्या एमर्जन्सीमध्ये तुम्ही फसलात आणि तुम्हाला जास्त पैशांची गरज भासत असेल तर तुम्ही क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट करू शकता. भले तुमच्या अकाउंटमध्ये पैसे नसतील तरीसुद्धा तुम्ही क्रेडिट कार्डमधून पेमेंट करू शकता. एवढेच नाही तर तुम्ही पेटीएमला क्रेडिट कार्डने रिचार्ज करू शकता आणि कॅश काढू शकता. परंतु याचे चार्जेस तुमच्याकडून घेण्यात येतील.
6) ईएमआयची सुविधा :
तुम्ही क्रेडिट कार्ड वापरकर्ते असाल तर तुम्हाला अगदी सहजरीत्या ईएमआयच्या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. तुम्हाला ईएमआयवर कोणतही व्याजदर द्यावं लागणार नाही यालाच नो कॉस्ट ईएमआय देखील म्हणतात. तसं पाहायला गेलं तर डेबिट कार्डवर देखील ईएमआय मिळू लागला आहे. परंतु फक्त क्रेडिट कार्डवरच दीर्घकाळ इएमआय सुविधा मिळते.
News Title : Credit Card Benefits need to know check details 04 September 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं