Devara Part 1 Movie | आता फक्त 'देवरा पार्ट 1' सिनेमाची चर्चा; एका तासात गाठला 10 मिलियन व्ह्यूजचा आकडा
Deprecated: Function wp_make_content_images_responsive is deprecated since version 5.5.0! Use wp_filter_content_tags() instead. in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
Highlights:
- ट्रेलर रिलीज – 1 तासातच 10 मिलियन व्ह्यूजचा आकडा गाठला
- ‘कोरतला सिवा’ यांचे दिग्दर्शन
- या डायलॉगने चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात
- 10 सप्टेंबरला चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला

Devara Part 1 Movie | ‘RRR’ या बहुप्रतिक्षित चित्रपटानंतर ‘N.T रामा राव Jr’ ‘देवरा पार्ट 1’ या तेलुगु चित्रपटामध्ये झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला असून अनेकांनी चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता दर्शवली आहे. धडाकेबाज ॲक्शनसह जूनियर एनटीआर, अभिनेत्री जानवी कपूर, सैफ अली खान यांसारखे कलाकार या चित्रपटाला लाभले आहेत. हे तिघं मुख्य भूमिकेत असल्याचे पाहायला मिळतायेत.
ट्रेलर रिलीज – 1 तासातच 10 मिलियन व्ह्यूजचा आकडा गाठला
या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्याबरोबर फक्त एका तासातच चक्क 10 मिलियन व्ह्यूजचा आकडा गाठला आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल 5 भाषांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हिंदी, तेलुगु, तमिळ, मल्यालम, कन्नड या भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. त्यामुळे जूनियर एनटीआर या अभिनेत्याची सर्वत्र वाहवाह होताना पाहायला मिळते.
‘कोरतला सिवा’ यांचे दिग्दर्शन
‘कोरतला सिवा’ यांचे दिग्दर्शन या चित्रपटाला लाभले असून अभिनेत्री जानवी कपूर पहिल्यांदाच जूनियर एनटीआर आणि सैफ अली खानबरोबर चित्रपटामध्ये एकत्रित झळकणार आहे. त्याचबरोबर सहायक भूमिकेमध्ये शायनी टॉम च्याको, मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे, मुराली शर्मा, अभिमन्यू सिंग, प्रकाश राज यांसारखे अनेक सहकलाकार चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहेत.
या डायलॉगने चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात
सस्पेन्स म्युझिक आणि ‘आखिर कौन थे वो लोग, ना जात ना धर्म जरासा भी डर नही’ अभिनेत्याच्या या डायलॉगने चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात होताना पाहायला मिळते. सुरुवातीलाच सैफ अली खानची फायटिंग दाखवली आहे. मध्येच डायलॉग, मध्येच सस्पेन्सफुल म्युझिक आणि त्यात अभिनेत्याचे डायलॉग अशा केमिस्ट्रीपासून सुरू होणारा या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना अधिक भावला आहे.
10 सप्टेंबरला चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला
10 सप्टेंबरला चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून, 27 सप्टेंबरला ‘देवरा पार्ट 1’ आपल्याला चित्रपटगृहांत पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचं नाव वाचूनच कळतय की, याचा दुसरा भाग देखील असणार आहे. सध्या ‘देवरा पार्ट 1’ ची चर्चा होताना दिसतीये.
View this post on Instagram
दरम्यान मुंबईमध्ये ट्रेलर लॉन्चचा इव्हेंट सुरू होता. त्यावेळी जूनियर एनटीआर यांना काही प्रश्न देखील विचारण्यात आले. चित्रपटाविषयीचा स्टंट रिलेटेड प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की,’ चित्रपटाच्या शेवटचे 30-40 मिनिट अतिशय रॉकिंग आहेत मला आता राहवत नाहीये कधी एकदा प्रेक्षकांसमोर हा चित्रपट येतोय असं झालं आहे’. अशा शब्दांमध्ये जूनियर एनटीआर व्यक्त झाले. असं ऐकल्याबरोबर प्रेक्षक चित्रपट पाहण्यास आतुर झाले आहे.
Latest Marathi News | Devara Part 1 Movie release date 12 September 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं