शिवेंद्रराजेंच ठरलं तर! विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला राजीनामा

मुंबई : विधानसभा निवडणुकीआधी एनसीपीला अजून एक धक्का बसला असून सातारा-जावळी मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपात प्रवेश करण्याची शक्यता असून त्यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. सोमवारी झालेल्या बैठकीत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपामध्ये प्रवेश करावा असा प्रस्ताव कार्यकर्त्यांनी मांडला होता. भारतीय जनता पक्षात प्रवेशाचा सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्याने शिवेंद्रसिंहराजे यांनी कार्यकर्त्यांच्या विचाराचाच निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगत एकप्रकारे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट संकेतच दिले.
येत्या विधानसभा निवडणुकीत खा. उदयनराजे भोसले यांच्याकडून दगा फटका होणार आहे, अशी भीती शिवेंद्रसिंहराजे यांना वाटत आहे. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे भारतीय जनता पक्षात जाणार असल्याचं बोललं जात होते. परंतु आता शिवेंद्रराजे यांचा निर्णय झाला आहे. ते आज कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. आणि उद्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
शिवेंद्रसिंहराजेंनंतर काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर, एनसीपीचे ऐरोलीतील आमदार संदीप नाईक आणि एनसीपी’चे वैभव पिचड यांनीही अपेक्षेनुसार विधानसभा अध्यक्षांकडे आपले राजीनामे दिले आहेत. उद्याच मुंबईत गणेश नाईक, संदीप नाईक शिवेंद्रसिंहराजे, कोळंबकर आणि पिचड यांचा प्रवेश भारतीय जनता पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे.
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राज्यात काँग्रेस-एनसीपी सरकार येणार नाही आणि तसे झाल्यास जनतेची कामे कशी करायची, असा सवाल उपस्थित करत मतदारसंघातील जनतेची माझ्यावर जबाबदारी आहे, अनेक प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी मला हा निर्णय घेणे भागच होते असे शिवेंद्रसिह राजे म्हणाले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं