Bigg Boss Marathi | निक्की-अरबाज बद्दल केला मोठा खुलासा म्हणाला, 'अख्या जगाला माहितीये ते सध्या काय करतायेत'
Deprecated: Function wp_make_content_images_responsive is deprecated since version 5.5.0! Use wp_filter_content_tags() instead. in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
Highlights:
- Bigg Boss Marathi
- काय म्हणाला वैभव?
- वैभवची मुलाखत सुरूच होती
- आता कोणता सदस्य एलिमिनेट होणार

Bigg Boss Marathi | मराठी बिग बॉसच्या पाचव्या सीजनने रंजक वळण घेतलेलं पाहायला मिळतंय. सातव्या आठवड्यामध्ये एलिमिनेशनमधून दोन सदस्य घराबाहेर पडले. पहिला सदस्य म्हणजे आर्या जाधव आणि दुसरा वैभव. आर्या ही तिच्या कृत्यामुळे घराबाहेर पडली तर, वैभवला प्रेक्षकांनी सेफ न केल्यामुळे त्याला घराबाहेरचा रस्ता धरावा लागला. वैभव घरातून बाहेर आल्यानंतर त्याच्या मुलाखती घेतल्या गेल्या. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखती दरम्यान वैभवने निक्की आणि अरबाजच्या नात्याबद्दल एक खुलासा केला.
काय म्हणाला वैभव?
निक्की आणि अरबाज या दोघांच्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा वैभवने सरळ शब्दांत उत्तर दिलं. तो म्हणाला,”इथे मग एकाला ब्लेम करून उपयोग नाहीये कारण की, तो जर म्हटलाय की मी कमिटेड आहे तर ते तिला पण माहितीये ना. निखिल आपण माहितीये ना तो कमिटेड आहे, मग तरीपण दोघं सोबत आहेत तर, आख्या जगाला माहित आहे ते दोघं काय करतायेत”. असं वैभव म्हणाला. पुढे त्याच्या बोलण्यातून असं देखील जाणवलं की, अरबाज आणि निक्कीच्या पर्सनल नात्याला वैभवचा अजिबात सपोर्ट नव्हता.
वैभवची मुलाखत सुरूच होती
पुढे वैभवची मुलाखत सुरूच होती. दरम्यान त्याच्याकडून खेळ कशाप्रकारे खेळायचा हे समजण्याची वृत्ती कुठेतरी कमी पडली असं त्याच्या बोलण्यातून समजून येत आहे. त्याचबरोबर त्याने मुलाखतीत जानवीचं देखील प्रचंड कौतुक केलं आहे. मी सुद्धा तिच्यासारखंच सिंगल खेळायला हवं होतं अशी भावना त्याने व्यक्त केली आहे.
आता कोणता सदस्य एलिमिनेट होणार
दरम्यान बिग बॉसच्या घरातून आता कोणता सदस्य एलिमिनेट होऊन घराबाहेरचा रस्ता धरणार याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे. त्याचबरोबर घरातील सगळ्यात भाऊक सदस्य म्हणजेच सुरज चव्हाण याची इच्छा बिग बॉस पूर्ण करणार की नाही? याकडे देखील सर्वांच लक्ष लागलेलं आहे. दुसऱ्या वाईल्ड कार्ड एन्ट्रीला घरामध्ये एक महिला सदस्या यावी अशी सुरजची इच्छा असून या गोष्टीबद्दल बिग बॉस यांनी सुरजची फिरकी घेतल्याचं पाहायला मिळालं.
Latest Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Vaibhav Chavan talk on Nikki Tamboli and Arbaz Patel relationship 18 September 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं