होंडाने मोटारसायकलींचे बनावट पार्टस बाजारातून जप्त केले

नवी दिल्ली : होंडा अँक्टिवा हि भारतातील सर्वात जास्त प्रमाणात विकली जाणारी मोटारसायकल आहे. दरमहा या मोटारसायकलीच्या २ लाख युनिट्सची विक्री होते. बाजारात या मोटारसायकलीचे बनावट पार्ट्स अगदी सहज आणि किमतीत मिळून जातात. या साठी कंपनीने बनवलेले अस्सल पार्टस कणी विकत घेतच नाही हे कंपनीच्या लक्षात आले. होंडाने बाजारात विकले जाणारे बनावट पार्टस जप्त करण्यास सुरुवात केली. आता हि मोहीम सफल होण्याच्या मार्गावर आहे. होंडाच्या बनावट पार्टसचे व्यवहार करणारे व्यापारी आणि उत्पादक यांच्याविरुद्ध होंडाने अंमलबाजवणीचे छापे टाकले आहेत.
या प्रभारीचे नेतृत्व करण्यासाठी कंपनीने बौद्धिक मालमत्ता हक्क अंमलबजावणी (आयपीआर) कार्यसंघाला सोपवले आहे. बनावट भागांच्या वाढत्या विक्रीमुळे होंडा कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागत होता. कारण कंपनीच्या अस्सल पार्ट्सच्या तुलनेत बनावट पार्टस अत्यंत कमी दारात बाजारात विकले जात होते. म्हणूनच होंडाने हे पार्टस जप्त करण्याचा निर्णय घेतला. व बनावट पार्टस बनवणाऱ्या उत्पादकांवर छापा टाकायला सुरु केले. सन २०१७ पासून होंडा जेन्युअन पार्टस (एचजीपी) मोहीम सुरु करण्यात आली. बनावट होंडा पार्टसचे व्यापारी आणि पुरवठादार यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. होंडाने दिल्ली आणि कटक येथे जून २०२९ मध्ये ४ यशस्वी छापेमारी अभियान स्थानिक पोलिसांच्या मदतीने हाती घेतले. स्पेयर पार्टस, ऍक्सेसरीज, विविध बनावट वस्तू , स्कुटर गार्ड, किट्स, पॅकेजिंग मशीन, आणि लेबल प्रिंटिंग मशीन यासह १०,४७२ बनावट वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या वस्तूंची किंमत ४९ लाख रुपये इतकी आहे.
तसेच दिल्ली पोलिसांनी चंडीरोड येथे बनावट होंडा ब्रँड नावाने कार्यरत असलेल्या दोन सर्व्हिस सेंटर वर छापा टाकला. व त्यांच्या मालकाला अटक केली. तसेच आयपीआर अंमलबजावणी पथकाने दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, सिकंदराबाद, गांधीनगर, मुंबई, हैदराबाद, अहमदाबाद या शहरातून साधारण २ कोटी रुपयांच्या बनावट वस्तू जप्त केल्या आहेत. आता ग्राहकांनी कंपनीचे मूळ व अस्सल पार्टस विकत घ्यावे असा आग्रह होंडा तर्फे करण्यात आला आहे. या पार्ट्सवर सिक्युरिटी टेम्पर प्रूफ एमआरपी लेबलसह होंडा जेनुइन्स सील केलेलं आहेत आणि त्यात मूळ होलोग्रामचा देखील समावेश आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं