Bigg Boss Marathi | घराबाहेर आल्यावर आर्या आणि योगीताची पहिली भेट; पाहा व्हिडिओ - Marathi News
Deprecated: Function wp_make_content_images_responsive is deprecated since version 5.5.0! Use wp_filter_content_tags() instead. in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-includes/functions.php on line 6114
Highlights:
- Bigg Boss Marathi
- पहिल्यांदा मैत्री जमली ती योगितासोबत
- आर्याने बिग बॉसच्या घरातील नियम मोडले
- मी तुला मारेल म्हणत आर्याने थेट

Bigg Boss Marathi | बिग बॉस मराठीचे सध्या पाचवे पर्व सुरू आहे. या घरात प्रत्येक आठवड्याला एक सदस्य घराबहेर पडताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात आर्या जाधव बिग बॉसच्या घरातील नियम मोडल्याने घराबाहेर आली. बाहेर पडल्यानंतर आता आर्याने बिग बॉसच्या घरातील तिच्या एका खास मैत्रिणीची भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पहिल्यांदा मैत्री जमली ती योगितासोबत
आर्या बिग बॉसच्या घरात असताना तिची पहिल्यांदा मैत्री जमली ती योगितासोबत. त्यामुळे बाहेर आल्यावर योगिता आणि आर्याची पहिली भेट झाली आहे. योगिता आणि आर्या एका शूटिंगच्या दरम्यान भेटल्या आहेत. दोघीही एकमेकींना भेटल्यावर चकित झाल्यात. त्यांच्या भेटीचा व्हिडिओ @trpmarathi या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. भेटल्यावर आर्या योगिताला पाहून म्हणते की मला विश्वास बसत नाहीये की तू इकडे आली आहेस. दोघीही एकमेकींना मिठी मारतात आणि मी तुला खूप मिस केलं असं सांगताना दिसत आहेत.
आर्याने बिग बॉसच्या घरातील नियम मोडले
दरम्यान, आर्याने बिग बॉसच्या घरातील नियम मोडले होते, त्यामुळे तिला बाहेरचा रस्ता दाखवला गेला. जादुई हिरा मिळवण्याच्या टास्क दरम्यान एक घटना घडली. निकी आणि आर्या यांच्यात वाद झाला. टास्क खेळत असताना आर्याने वॉशरूमचा दरवाजा बंद केला होता. त्यानंतर निकीने आरबाजच्या मदतीने दरवाजा खोलून आतमध्ये प्रवेश केला.
View this post on Instagram
मी तुला मारेल म्हणत आर्याने थेट…
या सर्वात निकीचा आर्याला धक्का लागला होता. मी तुला मारेल म्हणत आर्याने थेट निकीच्या कानशिलात लगावली होती. बिग बॉसच्या घरात हिंसा केल्याने आर्याला शिक्षा झाली. तिला बिग बॉसच्या घरातील जेलची हवा खावी लागली. त्यानंतर आर्याला नियम मिडल्याने घराबाहेर यावं लागलं आहे.
घराबाहेर आल्यावर आर्या तिच्या कामात आणि मुलाखतींमध्ये व्यस्त झालेली दिसत आहे. बिग बॉसच्या घरात असताना आर्याची योगिता बरोबर छान मैत्री झाली होती. योगिता बिग बॉसच्या घरातून तिसऱ्या आठवड्यातच घराबाहेर आली होती.
Latest Marathi News | Bigg Boss Marathi Aarya meet Yogita 21 September 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं