आजपासून इंग्लंड-ऑस्ट्रेलियात ‘अॅशेस’ मुकाबला

लंडनः वर्ल्ड कप स्पर्धेतील जेतेपदानंतर इंग्लंड संघाने पारंपरिक अॅशेस मालिकेसाठी दंड थोपटले आहेत. गुरुवारपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघाने अंतिम ११ सदस्यीय संघ जाहीर केला. पण, या संघात वर्ल्ड कपमधील इंग्लंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज जोफ्रा आर्चरला संधी मिळालेली नाही. त्याच्यासह सॅम कुरन आणि ऑली स्टोन यांना अंतिम अकरामध्ये स्थान पटकावता आलेले नाही. कर्णधार जो रूटने हा संघ जाहीर केला.
विश्वचषक स्पर्धेनंतर आता इंग्लंड संघ ही प्रतिष्ठेची मालिका जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करेल. याअगोदर ऑस्ट्रेलियात झालेल्या या मालिकेत ऑस्ट्रेलियानेच बाजी मारली होती. त्या पराभवाची परतफेड करण्यास इंग्लंड संघ सज्ज होत आहे. विश्वचषक स्पर्धा जिंकल्यामुळे यजमान इंग्लंड संघाचे मनोधैर्य निश्चितच उंचावले आहे. कागदावर तरी त्यांचेच पारडे जड आहे. गेले काही वर्षे इंग्लंड संघाने आपल्या घरच्या मैदानावर सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. तीच कामगिरी पुन्हा कायम राखण्यासाठी इंग्लंड संघातील खेळाडू उत्सुक आहेत.
#NewCoverPic pic.twitter.com/BiDlLqQw0Y
— ICC (@ICC) July 31, 2019
मागील वर्षी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या लढतीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथ, उपकर्णधार वॉर्नर आणि वेगवान गोलंदाज बँकक्रॉफ्ट यांच्यावर चेंडू कुडतडल्याप्रकरणी एक वर्षाची बंदी घातली होती. आता बंदी उठल्यामुळे हे तिघेजण प्रथमच ऑस्ट्रेलियाचे कसोटी सामन्यात पुन्हा प्रतिनिधीत्व करतील. या तिघांच्या कमबॅकमुळे ऑस्ट्रेलियाची ताकद मात्र वाढली आहे यात शंका नाही.
दरम्यान दुसरीकडे चेंडू फेरफार प्रकरणानंतर डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरून बँक्रॉफ्ट ही त्रिमूर्ती प्रथमच कसोटी सामना खेळणार आहे. टिम पेनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्याची धुरा जेम्स पॅटिन्सन आणि पॅट कमिन्स सांभाळणार असल्याचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत तिसरा गोलंदाज म्हणून मिचेल स्टार्क, जोश हॅझलवूड आणि पीटर सिडल यांच्यापैकी कोणाला संधी मिळते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
८ गेल्या १८ वर्षांत ऑस्ट्रेलियाने एकदाही इंग्लंडमध्ये अॅशेस मालिका जिंकलेली नाही. २००१मध्ये स्टीव्ह वॉच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने इंग्लंडमध्ये अखेरची अॅशेस जिंकली होती. ३३-३२ आतापर्यंत झालेल्या ७० अॅशेस मालिकांपैकी ऑस्ट्रेलियाने ३३, तर इंग्लंडने ३२ मालिकांमध्ये विजय मिळवला आहे. पाच मालिका बरोबरीत सुटल्या आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं