राज यांच्या EVM विरोधी आक्रमकपणामुळे ईडी'चं अस्त्र? भाजप राज ठाकरेंना घाबरल्याची चर्चा

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट काल थेट पश्चिम बंगालमध्येच जाऊन भेट घेतल्याने संपूर्ण राज्यातील भारतीय जनता पक्षामध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी दबक्या आवाजात भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. कारण सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) सुत्रांकडून प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना प्राप्त झालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लवकरच समन्स बजावण्यात येणार आहे. येणाऱ्या आठवड्यात हा समन्स बजावला जाण्याची शक्यता आहे. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, कोहिनूर मिल क्रमांक ३ विकत घेण्यामध्ये राज ठाकरे यांची भूमिका असून यासाठीच ते ईडीच्या रडारवर आहेत.
कोलकत्यात ममता बँनर्जींची राज ठाकरेंनी भेट घेऊन भारतीय जनता पक्षाची झोप उडवून दिली आहे आणि त्यानंतर झालेल्या एकूण हालचाली म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या जीव EVM मध्येच असल्याचा पुरावाच ते देत असल्याची चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे. आधीच राज ठाकरेंचा लोकसभेला मिळालेला प्रतिसाद आणि त्यादरम्यान राज ठाकरेंचे मुद्दे खोटे होते असे सांगणारा एकही माणुस सध्या तरी भाजपमध्ये नाही. त्यांनी भारतीय जनता पक्षाला फैलावर तर घेतलं आणि तेही उमेदवार उभे न करता.
दरम्यान आगामी विधानसभेला महाराष्ट्रात राज ठाकरे नावाचं वादळ इतक्या तीव्रतेने घोंगावेल ज्यात भारतीय-सेनेसकट विरोधी पक्षांची स्पेस देखील ते व्यापून टाकतील अशी शक्यता आहे. त्यामुळेच सैरवैर झालेल्या भाजपने राज ठाकरेंचे कार्यकर्ते-पदाधिकारी आणि त्यांचे चाहते यांना नियंत्रीत आणि EVM आंदोलनावरून परिवर्तित करण्यासाठी इडीच्या चौकशीचं पिल्लू सोडलं खरं, पण त्यात राज ठाकरेंची स्वच्छ प्रतिमाच यातुन त्यांना सहज बाहेर काढेल. जर भाजपने राज ठाकरेंसमोर इडीच्या चौकशीचा घाट घातलाच तर मात्र राज ठाकरेंचे कार्यकर्ते आहेत त्यापेक्षा आक्रमक पद्धतीने हा महाराष्ट्र पेटवतील आणि ज्यात भाजपसकट सर्वच मित्रपक्ष बँकफुटवर जातील. त्याचा थेट फायदा देखील मनसेलाच होईल अशी शक्यता आहे.
हा राजकारणाचा डाव बघता राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी इडीच्या चौकशीवर लक्ष न लावता भारतीय जनता पक्षाला फैलावर घेण्यासाठी राज ठाकरेंनी हाती घेतलेल्या इव्हीएमविरोधी आंदोलनावर डोळे ठेऊन पुढची वाट चालली तर राज ठाकरेंच्या मनसेने या विधानसभेची अर्धी लढाई बिगुल वाजण्याच्या आधीच जिंकलेली आहे अशी अशी चर्चा रंगली आहे आणि त्यामुळेच ते बिथरल्यासारखे निर्णय घेऊ लागले आहेत. भाजप खेळत असलेल्या राजकीय मानस शास्त्राचा राज ठाकरे यांच्यावर काडीचादेखील परिणाम होईल असं वाटत नाही. किंबहुना राज ठाकरे यांच्यावर थेट टिपणी करण्याची धमक खुद्द नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचेकडे देखील नाही हे लोकसभेतील प्रचारात सिद्ध झालं आहे आणि त्यामुळेच राज्यातील नेत्यांवर जवाबदारी देऊन ते राज यांना लक्ष करण्याचा प्रयत्न करताना दिसले.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी मानसिक दृष्ट्याच खचल्यात जमा आहेत, पण दुसरीकडे राज ठाकरे मोठा प्रभाव पाडू शकतात हे भाजपाला चांगलंच ठाऊक आहे. यामुळे त्यांची राजकीय प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची योजना आखली गेल्याचे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती मिळाली आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या खाजगी आयुष्यातील मुद्यावरून लक्ष केलं जाण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे.
राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना सरकारविरोधात बोलू नये आणि दबावात राहावं यासाठीच ही कारवाई केली जाणार आहे असंच प्रथम दर्शनी तरी दिसत आहे. तसंच राज ठाकरे यांना मुंबईतच अडकून ठेवण्याचीही योजना आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांना वारंवार ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात येईल आणि तासनतास प्रतिक्षा करत बसवून ठेवण्यात येईल. याआधी ईडीने कोहिनूर सीटीएनएलचे मुख्य वित्त अधिकारी यांचा जबाब नोंदवून घेतला असून आता राज ठाकरे यांना चौकशीसाठी समन्स बजावला जाणार आहे.
ईडी आणि गंभीर फसवणूक अन्वेषण कार्यालय कोहिनूर सीटीएनलमध्ये आयएल अँड एफएस ग्रुपच्या कर्ज आणि ८६० कोटींच्या गुंतवणुकीचा तपास करत आहे. ही कंपनी मुंबईत कोहिनूर स्क्वेअर टॉवर्स उभारत आहे. ही कंपनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेश जोशी याने सुरु केली होती. वास्तविक याच विषयाला अनुसरून माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी आणि त्यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांना लक्ष करण्याएवजी राज ठाकरे यांच्यासंबंधित बातम्या पेरण्याचा घाट घातला गेल्याचे वृत्त आहे. त्यामुळे मनसे ईव्हीएम विरोधी आंदोलावर काय निर्णय घेणार आणि तारखेला पुण्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे काय घोषणा करत आक्रमक होणार ते पाहाव लागणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं