Smart Investment | सरकारची 100% रिटर्न मिळवून देणारी भन्नाट योजना, 8.2% व्याजदराने कमवाल बक्कळ पैसे - Marathi News

Smart Investment | सरकारने आतापर्यंत बऱ्याच स्मॉल सेविंग योजनांमधील व्याजदरावर कोणत्याही प्रकारचा बदल केला नाही आहे. तिमाही आधारावर व्याजदर बदलले जातात परंतु सरकारने सुकन्या समृद्धी योजनेसारख्या छोट्या बचतीच्या योजनांमध्ये कोणत्याही प्रकारचे व्याजदर बदलले नाही आहे. मागील वर्षी 2023-24 मध्ये चौथ्या तिमाही आधारावर व्याज दरात बदल केले होते. त्यानंतर ते व्याजदर अजून देखील तसेच आहेत. आज आपण सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याजदराबद्दल त्याचबरोबर संपूर्ण योजनेबद्दल माहिती करून घेणार आहोत.
सुकन्या समृद्धी योजना :
सुकन्या समृद्धी योजना ही सरकारमार्फत चालू असणारी एक जबरदस्त योजना आहे. या योजनेमध्ये कोणताही भारतीय नागरिक आपल्या मुलीसाठी खातं उघडू शकतो. योजनेमध्ये वयाची अट अशी आहे की, मुलीचं वय 1 ते 10 वर्षांमध्ये असायला हवं. तुम्ही या योजनेत 15 वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता. त्यानंतर तुमच्या मुलीच्या 21व्या वर्षी योजनेचा मॅच्युरिटी टाईम पूर्ण होईल. त्यानंतर तुम्ही गुंतवलेले पैसे तुम्ही काढून घेऊ शकता.
योजनेवर किती टक्के व्याजदर आहे :
सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेमध्ये 8.2% या दरानुसार व्याजदर प्रदान केले जात आहे. अनेकजण या व्याजदराचा लाभ घेत आहेत. नोटिफिकेशन नुसार तुम्हाला आधीसारखंच 8.2% टक्के दराने व्याजदर मिळणार आहे.
योजनेमध्ये पैसे गुंतवणुकीची लिमिट :
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये तुम्ही कमीत कमी 250 रुपये भरून योजनेला सुरुवात करू शकता. त्याचबरोबर योजनेमध्ये जास्तीत जास्त पैसे भरण्याची लिमिट 1.5 लाख रुपये आहे. ही लिमिट एका वर्षापूर्वी मर्यादित आहे. म्हणजेच तुम्ही या योजनेत केवळ एका वर्षाकरिता 1.5 लाख रुपये जमा करू शकता. त्याच्यापेक्षा जास्तीची रक्कम तुम्हाला जमा करता येणार नाही.
दरमहा 10,000 रुपये गुंतवल्यावर जमा होईल एवढा फंड :
समजा एखाद्या व्यक्तीने सुकन्या समृद्धी योजनेमध्ये मुलीच्या पाचव्या वर्षापासून प्रत्येक महिन्याला तिच्या नावाने खात्यात 10,000 हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास सुरू केले तर, प्रत्येक वर्षाला 1.2 लाखांची रक्कम जमा होते. 8.2% या वाजवी व्याजदरानुसार आणि मॅच्युरिटी पिरियडनंतर म्हणजेच मुलीच्या 21 व्या वर्षानंतर 55.61 लाख रुपयांचा मोठा फंड जमा करू शकता. यामध्ये गुंतवणुकीची रक्कम 17.93 असेल आणि केवळ व्याजाची रक्कम 37.68 रुपये असेल. म्हणजे तुम्ही व्याजदराने जास्तीचे पैसे कमवू शकता.
Latest Marathi News | Smart Investment 07 October 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं