IRFC Vs BEL Share Price | हे PSU शेअर्स करणार मालामाल, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - Marathi News

IRFC Vs BEL Share Price | मंगळवारी हरयाणा राज्यात BJP पक्षाचे सरकार स्थापन होण्याचे संकेत मिळताच त्याचे पडसाद शेअर बाजारावर देखील उमटले होते. विशेष म्हणजे PSU शेअर्स तुफान तेजीत आले होते. PSU शेअर्सची गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी झाल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे निफ्टी PSE निर्देशांकांत जवळपास 2 टक्क्यांची वाढ झाली होती. निवडणुकीचे कल जवळपास निश्चित होताच निफ्टी PSE निर्देशांकात बोलायचे झाले तर तो 208.05 टक्क्यांच्या वाढीसह 10715.30 अंकांवर बंद झाला.
IRFC शेअर सहित हे शेअर्स सुद्धा तेजीत
आजच्या तेजीत पीएफसी कंपनीचे शेअर ६.४४% वधारून ४६६.९० रुपयांवर पोहोचले. तसेच PSU IRFC स्टॉक ५.४७%, BEL स्टॉक ५.२९% आणि REC स्टॉक ५.०७% वाढले. तसेच HAL स्टॉक देखील ५ टक्क्यांनी वाढून ४३७४ रुपयांवर बंद झाला. मात्र NMDC, सेल आणि पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन हे PSU कंपनीचे शेअर्स मंगळवारी ३.९१% घसरले.
निफ्टी सीपीएसई इंडेक्समध्ये या शेअर्समध्ये खरेदी
मंगळवारी कोचीन शिपयार्ड लिमिटेड आणि इंडिया इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स तब्बल ५% वाढले. या व्यतिरिक्त NLC इंडिया आणि एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्समध्येही जवळपास ३% वाढ झाली. विशेष म्हणजे PSU कोचीन शिपयार्ड लिमिटेड कंपनीचे शेअर्स सलग ४ दिवसांच्या घसरणीनंतर तेजीचे आले होते.
रेल्वे शेअर्स तुफान तेजीत
आज मंगळवारी अनेक रेल्वे स्टॉक सुद्धा मजबूत तेजीत होते. IRFC चा शेअर एनएसईवर ५.४७ टक्क्याने वाढून १५२.२५ रुपयांवर पोहोचला. तर IRCTC चे शेअर्स २.२४ टक्क्यांनी वाढून बंद झाले. विशेष म्हणजे सलग चार दिवसांच्या घसरणीनंतर PSU RVNL शेअरमध्ये ८.३५% वाढ होऊन तो ४९४.८५ रुपयांवर पोहोचला होता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | IRFC Vs BEL Share Price 09 October 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं