Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार स्टॉक, कंपनीबाबत अपडेट आली - Marathi News

Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर फोकसमध्ये आला आहे. बुधवारी ट्रेडिंग वेळी गुंतवणूकदारांनी सुझलॉन शेअरची (NSE: SUZLON) जोरदार खरेदी केली. बुधवार दिनांक 09 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 4.70 टक्के वाढून 77.10 रुपयांवर ट्रेड करत होता. (सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी अंश)
मागील काही दिवस शेअर बाजार सातत्याने घसरत होता. या दरम्यान, निफ्टीने दिवसाचा उच्चांक २५२३४ चा उच्चांक गाठला होता, पण त्यानंतर निफ्टी ३१ अंकांनी घसरून २४९८२ च्या पातळीवर बंद झाला होता. मात्र आज शेअर बाजाराच्या पडझडीला ब्रेक लागला आणि आज सुझलॉन शेअर देखील तेजीत असल्याचं पाहायला मिळालं.
बुधवारी शेअर बाजारातील अनेक शेअर्स तेजीत होते आणि गुंतवणूकदारांची मोठी कमाई झाली. दरम्यान, सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचा शेअर देखील 4.70 टक्क्यांनी वधारून 77.10 रुपयांवर बंद झाला. तत्पूर्वी सुझलॉन एनर्जी स्टॉक 9 टक्क्यांनी वधारला होता आणि शेअरने 80.60 रुपयांचा उच्चांक गाठला होता. आजच्या तारखेपर्यंत सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे मार्केट कॅप 1,03,741 लाख कोटी रुपये आहे. गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 2.02 टक्के घसरून 75.14 रुपयांवर ट्रेड करत होता.
शेअर ASM श्रेणीतून बाहेर
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअरला आता काउंटरला स्टेज 1 (ASM) श्रेणीतून बाहेर काढण्यात आले आहे. मागील महिन्यात सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर ASM स्टेज 1 श्रेणीत देखरेख खाली ठेवले गेले होते. मात्र आता हा स्टॉक स्टेज 1 (ASM) श्रेणीतून बाहेर आल्याने गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी सुरु झाली आहे.
ASM ही एक नियामक प्रणाली
ASM ही एक नियामक प्रणाली असून ती एखाद्या विशिष्ट सुरक्षिततेसाठी अतिरिक्त देखरेख प्रदान करण्यासाठी एक्सचेंजद्वारे स्थापित करण्यात आली आहे. जेव्हा एखादा स्टॉक स्टेज 1 ASM मध्ये ठेवला जातो, तेव्हा एक्सचेंजद्वारे कसून छाननी केली जाते आणि त्यावेळी गुंतवणूकदारांना ट्रेडिंगसाठी 100% मार्जिनची आवश्यकता पूर्ण करावी लागते.
शेअरने 900% परतावा दिला
सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मागील ३ महिन्यांत ४०% आणि ६ महिन्यांत ९०% परतावा दिला आहे. दरम्यान, YTD तत्त्वावर सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी १०२% इतका मल्टीबॅगर परतावा दिला आहे. तसेच मागील १ वर्षात या शेअर १८०% परतावा दिला आहे. तर मागील २ वर्षांत सुझलॉन शेअरने गुंतवणूकदारांना ९००% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Suzlon Share Price 10 October 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं