Loan Against Property | प्रॉपर्टी लोन घेण्यासाठी नेमके काय करावे लागते, फायद्यांसह जाणून घ्या सर्व माहिती - Marathi News

Loan Against Property | अगदी कोणत्याही व्यक्तीला जास्तीच्या रकमेची गरज कधीही आणि कुठेही भासू शकते. खास करून अशा व्यक्तींना ज्यांनी कोणत्याही ठिकाणी पैशांची गुंतवणूक केली नाहीये.
पैशांची गरज प्रत्येक व्यक्तीला असते. अशातच संकटकाळी आपल्याकडे जमापुंजी म्हणून थोडेफार पैसे सेविंग असावे असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं. यासाठी अनेकजण प्रयत्न देखील करतात. परंतु ज्या व्यक्तींना नोकरी नाहीये त्याचबरोबर त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे पैसे सेविंग नाही आहेत तर अशा व्यक्तींना गरजेसाठी बँकेकडून लोन उचलावे लागते. परंतु अशावेळी तुम्हाला पर्सनल लोन मिळण्यासाठी थोडी झिगझिक करावी लागेल किंवा तुम्हाला पर्सनल लोन देण्यापासून सबशेर नकार देखील दिला जाईल. चुकून तुम्हाला लोन मिळालंच तर तुम्हाला मिळालेल्या पैशांवर जास्तीचे व्याजदर परत करावे लागतील. अशावेळी नेमकं काय करावं हेच अनेकांना सुचत नाही.
परंतु चिंता नको तुम्ही तुमच्या संकटकाळी पर्सनल ऐवजी प्रॉपर्टी लोन घेऊ शकता. यामध्ये तुम्ही तुमची कमर्शियल प्रॉपर्टी कोलेटरल करून उधारीवर पैसे घेऊ शकता. परंतु त्यासोबत तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे.
तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी लोन घेताय याचा विचार करा :
लोन घेण्याचा नेमकं काय कारण असेल हे तुम्हाला माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या छोट्या मोठ्या गरजांसाठी, घर खरेदी करण्यासाठी किंवा घरदार वाढवण्यासाठी यांपैकी तुम्ही नेमक्या कोणत्या कामासाठी लोन घेत आहात हे तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. तुम्ही तुमचा फायनान्शिअल प्लॅनिंग व्यवस्थित पद्धतीने केलं तर, तुम्हाला लोन घेण्याचे फायदे आणि नुकसान दोन्हीही गोष्टींवर विचार करायला सोपे जाईल. कारण की बऱ्याचदा लोक लोन तर घेतात पण, वेळेवर पेडू शकत नाहीत. त्यामुळे तुम्ही विचारपूर्वक लोन घ्या.
प्रॉपर्टीची व्हॅल्युएशन :
कोणतीही बँक कोणत्याही संबंधित लोन देताना तुमच्याकडून तुमची सर्व माहिती घेतली जाते. तुम्हाला देण्यात येणारं लोन तुमच्या आर्थिक स्थितीवर डिपेंड करते. कारण की प्रॉपर्टीच्या किंमती पडल्या तर, निगेटिव्ह इक्विटी तयार होते. या कारणामुळे तुमचे नुकसान देखील होऊ शकते.
प्रॉपर्टी लोन हे एक सुरक्षित लोन आहे :
प्रॉपर्टी लोन अनेकांना सुरक्षिततेचे वाटते. कारण की यामध्ये तुम्ही प्रॉपर्टीचा वापर कोलेटरलच्या रूपात करता. या कारणामुळे जी बँक तुम्हाला लोन देते तिच्यासाठी ही गोष्ट सुरक्षिततेची असते. त्याचबरोबर प्रॉपर्टी लोनवर तुम्हाला कमी व्याजदर भरावे लागते. परंतु लोन घेणाऱ्या व्यक्तीकडून पेमेंटमध्ये उशीर झाला किंवा पेमेंट भरले गेले नाही तर, अशा स्थितीमध्ये तुमच्या प्रॉपर्टीचे नुकसान होऊ शकते.
चार्जेसबद्दल जाणून घ्या :
सुरक्षित लोन हवे असेल तर तुम्हाला विविध प्रकारचे शुल्क भरावे लागतील. ज्यामध्ये प्रॉपर्टीच्या किमतींच्या व्हॅल्युएशनचे शुल्क, एप्लीकेशनसाठी प्रोसेसिंग शुल्क, कागदपत्र किंवा व्हेरिफिकेशनसाठी लागणारे शुल्क तुमच्याकडून घेण्यात येतील. एवढेच नाही तर, प्रॉपर्टी रेकॉर्डिंग, स्टॅम्प ड्युटी, प्रॉपर्टी इन्शुरन्स आणि मोर्टगेज रजिस्ट्रेशन शुल देखील शामिल असते.
Latest Marathi News | Loan Against Property 10 October 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं