Railway Ticket Booking | रेल्वे प्रवाशांना, तिकीट बुकिंगचे नियम बदलले, IRCTC ने नियम बदलले, लक्षात घ्या, अन्यथा अडचण होईल

Railway Ticket Booking | भारत रेल्वेने आय आरसीटीसीच्या माध्यमातून ट्रेनमध्ये काही नवीन नियमांचे बदल केले आहेत. हे बदल सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत फायद्याचे असणार आहेत. दरम्यान नियमांमुळे नागरिकांना प्रवासाचे नियोजन करण्यास सोपे जाणार आहे.
बदललेला मोठा नियम :
IRCTC ने रेल्वे प्रवाशांकरीता बुकिंग प्रोसेस भरपूर प्रमाणात सोपी आणि सोयीची केली असून आधी प्रवाशांना लांबचा पल्ला गाठण्यासाठी आणि तिकीट बुकिंगसाठी 120 दिवस थांबावं लागायचं. परंतु आता तसं नाही. अगदी कोणताही व्यक्ती केवळ 60 दिवसांपहिले तिकीट बुक करून प्रवासाचे नियोजन आखू शकतो.
नियम लागू होण्याची तारीख :
रेल्वेने बदललेला हा नियम लागू होण्यासाठी प्रवाशांना आणखीन काही दिवस वाट पहावी लागणार आहे. कारण की पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून म्हणजे 1 नोव्हेंबर 2024 या तारखेपासून रेल्वेने बदललेल्या या नव्या नियमाचा अवलंब होणार आहे.
कोणत्या क्लासमध्ये लागू होणार नियम :
भारतीय रेल्वेने बदललेले हे नियम एसी आणि नॉन एसी कॅटेगिरीकरिता लागू होणार आहेत.
तिकीट बुकिंगसाठी होणार AI मॉडेलचा उपयोग :
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितल्याप्रमाणे ट्रेनमध्ये एआय मॉडेलचा वापर केल्यामुळे तिकिटांमध्ये आधीपेक्षा जास्त वृद्धी पाहायला मिळाली आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी त्याचबरोबर रेल्वेसाठी देखील एआय हे मॉडेल फायद्याचे ठरणार आहे.
या ट्रेनसाठी नियमावली बदलली नाही :
काही ट्रेन सोडल्या तर सर्व ट्रेनसाठी रेल्वेचा नवीन नियम लागू होत आहे. परंतु ताज आणि गोमती एक्सप्रेससाठी नवा नियम लागू होत नाही. कारण की या ट्रेन फार कमी दिवसांसाठी असतात.
आधीच बुक झालेल्या तिकिटांचं काय होईल :
आधीच बुक झालेल्या तिकिटांवर नियमावली लागू होणार नाही. 1 नोव्हेंबरनंतर जो कोणता व्यक्ती तिकीट बुक करेल त्याच्यासाठी नियमावली लागू करण्यात येईल. कारण की हा नियम रेल्वेने खास प्रवाशांचे प्रवासादरम्यानचे हाल रोखण्यासाठी बनवला आहे. 120 दिवसांच्या कालावधीमध्ये ट्रेन टिकिट कॅन्सलेशनसारख्या समस्या येतात. त्यामुळे 60 दिवसांत तिकीट बुक करून तुम्ही प्रवासाचे योग्य नियोजन करू शकता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Railway Ticket Booking 19 October 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं