EPFO Monthly Pension | पगारदारांनो, तुम्हाला तुमचा PPO नंबर ठाऊक आहे का, अन्यथा पेन्शन विसरा, असा मिळवा PPO नंबर

EPFO Monthly Pension | PPO हा 12 अंकी नंबर असतो. जो पेन्शन धारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. सध्या नोव्हेंबर महिना सुरू असून बरेच पेन्शन लाभार्थी आपलं जीवन प्रमाणपत्र जमा करण्यास जुपले आहेत.
80 वर्षांपुढे असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी जीवन प्रमाणपत्र जमा करण्याची तारीख 1 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. आता सर्व पेन्शन धारकांसाठी शेवटची तारीख 30 नोव्हेंबर सांगितली गेली आहे. 30 नोव्हेंबरच्या आत सर्व पेन्शन लाभार्थ्यांनी आपले जीवन प्रमाणपत्र जमा करावे. त्याचबरोबर पीपीओ नंबर हा देखील पेन्शनसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. हा 12 अंकी नंबर आयडेंटिफिकेशन कोड प्रमाणेच काम करतो.
PPO नंबर विषयी संपूर्ण माहिती जाणून घ्या :
पीपीओ नंबर हा एक बारा अंकी नंबर असून सर्व प्रकारचे ट्रांजेक्शन आणि कम्युनिकेशनसाठी एका रेफरन्सप्रमाणे काम करतो. बारा अंकांच्या या पीपीओ नंबरामधील पहिले 5 नंबर अधिकाऱ्याचा कोड दर्शवते. त्यानंतरचे 2 अंक सुरू करण्याचे वर्ष दर्शवते. पेन्शन लाईफ सर्टिफिकेट जमा करताना त्याचबरोबर पेन्शन काढताना किंवा पेन्शन संबंधित इतर कोणत्याही गोष्टीसाठी पीपीओ नंबर हा महत्त्वाचा असतो.
सोप्या पद्धतीने मिळवा पीपीओ नंबर :
1. सर्वप्रथम तुम्हाला ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे.
2. त्यानंतर ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये एंटर करून फॉर एम्प्लॉईज आणि पेन्शनर्स पोर्टल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे.
3. आता संपूर्ण डिटेल्स ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा पीपीओ नंबर शोधायचा आहे.
4 समोर असलेल्या स्क्रीनवर तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरून पीपीओ नंबर घ्यायचा आहे.
5. तुमचा पीपीओ नंबर तिथेच असेल जिथे तुमचे बँक खात्याचे आणि पीएफ खात्याचे नंबर उपलब्ध असतील.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | EPFO Monthly Pension 13 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं