Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News

Pension Life Certificate | आपल्या भारत देशात एकूण 69.76 लाख नागरिक सरकारी पेन्शन लाभार्थी आहेत. पेन्शन लाभार्थ्यांसाठी ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर हे दोन महिने अत्यंत महत्त्वाचे असतात. कारण की या महिन्यांमध्ये पेन्शन लाभार्थ्यांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट जमा करायचे असते. समजा हे सर्टिफिकेट जमा केले नाही तर, पेन्शन लाभार्थ्याची पेन्शन कायमची बंद होते.
इथे करता येईल पेन्शन लाईफ सर्टिफिकेट जमा :
समजा एखाद्या पेन्शन लाभार्थ्याने नोव्हेंबरच्या शेवटच्या तारखेपर्यंत पेन्शन लाईफ सर्टिफिकेट जमा केले नाही तर, लगेचच डिसेंबर महिन्यापासून पेन्शन पूर्णपणे बंद करण्यात येईल. लाईफ सर्टिफिकेट जमा करण्याचे दोन प्रकारचे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. एक म्हणजे ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि दुसरं म्हणजे ऑफलाइन. ऑफलाइन पद्धतीने सर्टिफिकेट जमा करण्यासाठी तुम्ही थेट पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन किंवा बँकांमध्ये जाऊन सर्टिफिकेट जमा करू शकता. त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने डोअर स्टेप बँकिंग एजंट आणि बँकेमध्ये देखील ऑनलाईन पद्धतीने सर्टिफिकेट जमा करू शकता.
लाइफ सर्टिफिकेट जमा करण्याची शेवटची तारीख काय आहे :
लाईफ सर्टिफिकेट जमा करण्यासाठी एक निश्चित वयोमर्यादा दिली गेली आहे. ज्यामध्ये 80 वर्षापेक्षा कमी असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी 1 ते 30 नोव्हेंबर म्हणजेच संपूर्ण एक महिन्याचा कालावधी दिला गेला आहे. त्याचबरोबर 80 वर्षा उलटून गेलेल्या व्यक्तींसाठी कालावधी 1 ऑक्टोबरपासूनच सुरू झाला आहे. कारण की 2019 वर्षापासून केंद्र सरकारने 80 वर्षापुढील ज्येष्ठ नागरिककांकरिता प्रत्येक वर्षी 1 ऑक्टोबर पासूनच लाईफ सर्टिफिकेट जमा करण्यास अनुमती दिली आहे.
सोप्या पद्धतीने ऑनलाईन सर्टिफिकेट जमा करा :
1. जीवन प्रमाणपत्र आणि आधार फेस आरडी या ॲपद्वारे तुम्ही चेहरा, फिंगर प्रिंट, बायोमेट्रिक करून घरबसल्या काम करू शकता. यासाठी तुमचा आधार कार्ड नंबर बँक खात्याशी लिंक्ड असला पाहिजे.
2. एप्लीकेशन डाउनलोड केल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती भरून घ्या. सोबतच तुमचा देखील फोटो पाठवा. स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करत तुम्हाला पेन्शन लाईफ सर्टिफिकेट जमा करून घ्यायचे आहे. जेणेकरून तुमची पेन्शन पुढील वर्षापर्यं सातत्याने सुरू राहील.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Pension Life Certificate 23 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं