Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 2 दिवसात 20% वाढला, दुसरी अपडेट आली, स्टॉक प्राईसवर परिणाम होणार - NSE: IDEA

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात १८.०८ टक्क्यांची वाढ (NSE: IDEA) झाली होती आणि बुधवार 27 नोव्हेंबर रोजी हा शेअर 1.60 टक्के वाढून 7.64 रुपयांवर पोहोचला होता. मात्र शेअर्समध्ये अचानक झालेली ही वाढ लक्षात घेता स्टॉक एक्सचेंजने व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीकडून स्पष्टीकरण मागितले होते. कंपनीच्या बँक गॅरंटी प्रकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने तत्त्वत: मान्यता दिल्याच्या मीडिया रिपोर्टबाबतही कंपनीला विचारण्यात आले. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
कंपनीने अधिकृत माहिती दिली
आता व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. केंद्रीय दूरसंचार विभागाने २०२२ पर्यंत केलेल्या लिलावात खरेदी केलेल्या स्पेक्ट्रमसाठी दूरसंचार कंपन्यांनी दिलेली बँक गॅरंटी माफ करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याचे व्होडाफोन आयडिया कंपनीने म्हटले आहे.
भारत सरकार आणि व्होडाफोन आयडिया कंपनी
व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने माहिती देताना म्हटले आहे की, ‘मात्र कोणत्याही निर्णयाबद्दल केंद्रीय दूरसंचार विभाग किंवा भारत सरकारकडून अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही किंवा वेबसाइटवर कोणतेही प्रसिद्धीपत्रक उपलब्ध नाही. केंद्रीय दूरसंचार विभागाकडून कोणताही निर्णय कळताच किंवा भारत सरकारचा कोणताही निर्णय प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपलब्ध होताच व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी अधिकृत खुलासा करेल.
नोमुरा इंडिया ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग
आयडिया लिमिटेड कंपनी शेअरसाठी नोमुरा इंडिया ब्रोकरेज फर्मने ‘BUY’ रेटिंग दिली आहे. नोमुरा इंडिया ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया कंपनी शेअरसाठी १४ रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. त्यामुळे सध्याच्या शेअर प्राईसवरून गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट होऊ शकतात असे संकेत नोमुरा इंडिया ब्रोकरेज फर्मने दिले आहेत.
शेअर ६ महिन्यात 49.24% घसरला
मागील ५ दिवसात व्होडाफोन आयडिया शेअरने 10.09% परतावा दिला. मागील १ महिन्यात हा शेअर 7.39% घसरला आहे. मागील ६ महिन्यात व्होडाफोन आयडिया शेअर 49.24% घसरला आहे. मागील १ वर्षात व्होडाफोन आयडिया शेअर 42.34% घसरला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 11.53% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर हा शेअर 55.06% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Vodafone Idea Share Price 27 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं