EPFO Pension News | पगारदारांनो, सेवानिवृत्ती मिळण्याआधी पेन्शन काढता येते का; तुम्हाला सुद्धा प्रश्न पडलाय, मग वाचा सविस्तर

Pension News | संघटित क्षेत्रांत काम करणारे सर्व कर्मचारी पेन्शनसाठी पात्र असतात. हे सर्व कर्मचारी EPS म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमधून सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळवू शकतात. परंतु काही व्यक्तींना निवृत्त होण्याआधीच पेन्शन प्राप्त करायची असते. दरम्यान बऱ्याच लोकांचा हा कॉमन प्रश्न असतो तो म्हणजे, सेवानिवृत्तीआधी आपल्याला पेन्शन मिळते का. तर याचे उत्तर होय आहे. जाणून घ्या याची संपूर्ण प्रोसेस.
सेवानिवृत्तीआधी पेन्शन करता येते का :
1. संघटित क्षेत्रात काम करणारा कोणताही कर्मचारी निवृत्तीआधी पेन्शन काढू शकतो. परंतु यासाठी काही अटी दिल्या गेल्या आहेत.
2. या अटींमध्ये सर्वप्रथम पहिली अट म्हणजे, तुम्हाला ईपीएफओ मजेत कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे सदस्यत्व घ्यावे लागेल. तुम्ही सदस्यत्व घेतले नाही तर, तुम्हाला निवृत्तीआधी पैसे काढता येणार नाहीत.
3. दुसरी अट म्हणजे कोणत्याही कंपनीमध्ये कर्मचाऱ्याने 20 व्यक्तींनी काम केले तर, तो ईपीएफओ सदस्यांच्या यादीमध्ये रजिस्टर होतो.
4. पुढची अट म्हणजे कर्मचाऱ्याने कोणत्याही एका कंपनीमध्ये सातत्याने 10 वर्ष काम केलेले असावे. तरच तुम्हाला 50 ते 57 वर्षामध्येच पेन्शन प्राप्ती होईल.
लवकर पेन्शन काढता येईल :
तुम्ही सेवानिवृत्तीआधीच म्हणजेच 58 व्या वर्षाआधी पेन्शन काढू शकता. परंतु लवकर पैसे काढून घेतल्यास तुमच्या खात्यातील रक्कम सहाजिकच कमी होईल. समजा तुम्ही वयाच्या 54 वर्षाला पेन्शन काढण्याचा विचार केला तर, तुम्हाला केवळ 84% पेन्शन देण्यात येईल. एवढेच नाही तर सेवानिवृत्तीनंतर प्रत्येक वर्षाला तुमच्या पेन्शनमधील 4% रक्कम कापून उर्वरित पेन्शन दिली जाईल.
समजा तुम्हाला भविष्यात दीर्घकाळापर्यंत जास्तीत जास्त पेन्शन हवी असेल तर, तुम्ही निवृत्तीच्याआधी पेन्शन काढून घेऊ नका. परंतु काही व्यक्तींना गरजेसाठी मन नसताना सुद्धा पैसे काढावे लागतात. अशावेळी तुम्हाला भविष्यात 4 टक्के कमी पेन्शन येणार याची कल्पना असावी.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | EPFO Pension News 29 November 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं