RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL

RVNL Share Price | बुधवार 11 डिसेंबर 2024 रोजी रेल्वे शेअर्स पुन्हा तेजीत आल्याचं दिसून आलं आहे. मागील काही महिन्यांपासून रेल्वे शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. नोव्हेंबरच्या नीचांकी पातळीनंतर रेल्वे कंपनीचे शेअर्स पुन्हा १५ ते २० टक्क्यांनी वधारले आहेत.
आता केंद्रीय अर्थसंकल्पावर गुंतवणूकदारांची नजर आहे. नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने हजारो कोटींच्या नवीन रेल्वे प्रकल्पांची घोषणा केली आहे. त्यानंतर रेल्वे सेगमेंटमधील कंपन्यांना पुन्हा कॉण्ट्रॅक्ट मिळण्यास सुरुवात झाली आहे. मिरे ऍसेट शेअरखान ब्रोकरेजने आरव्हीएनएल आणि इरकॉनच्या शेअर्स येत्या १५ दिवसांसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
मिरे ऍसेट शेअरखान ब्रोकरेज फर्म – आरव्हीएनएल शेअर टार्गेट प्राईस
मिरे ऍसेट शेअरखान ब्रोकरेजने पुढील १५ दिवसांसाठी आरव्हीएनएल शेअरला ‘BUY’ रेटिंग दिला आहे. ब्रोकरेजने हा शेअर ४८० रुपयांच्या रेंजमध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. तसेच 455 रुपयांचा स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील दिला आहे. मिरे ऍसेट शेअरखान ब्रोकरेजने RVNL शेअरसाठी ५०२ रुपये ही पहिली टार्गेट आणि दुसरी टार्गेट प्राईस ५२५ रुपये दिली आहे. आरव्हीएनएल शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 647 रुपये आणि नीचांकी स्तर 165.60 रुपये होता.
मिरे ऍसेट शेअरखान ब्रोकरेज फर्म – इरकॉन शेअर टार्गेट प्राईस
मिरे ऍसेट शेअरखान ब्रोकरेज फर्मने इरकॉन कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिला आहे. इरकॉन शेअर पुढील 5 दिवसांसाठी खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे. हा शेअर 232 रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करावा असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. इरकॉन शेअरसाठी २४० रुपये ही पहिली टार्गेट आणि २४५ रुपये ही दुसरी टार्गेट प्राईस देण्यात आली आहे. तसेच २२५ रुपयांवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | RVNL Share Price Wednesday 11 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं