EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो

EPF Pension Money | ईपीएस नियमांअंतर्गत ईपीएफ आणि ईपीएस कर्मचारी सेवानिवृत्त होण्याआधीच पेन्शन प्राप्त करू शकतात. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक कर्मचारी ईपीएस नियमांमध्ये सांगितल्याप्रमाणे 58 वय झाल्यानंतरच त्याला पेन्शन मिळणे सुरू होते. ईपीएस पेन्शनमध्ये अर्ली पेन्शन हा एक पर्याय देखील कर्मचाऱ्यांना दिला जातो. या पर्यायामध्ये ईपीएस खातेधारक 50 वय झाल्यानंतर देखील पेन्शन प्राप्तीसाठी पात्र ठरू शकतो.
ईपीएफ आणि ईपीएफमधील योगदान किती :
खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार आणि महागाई भत्ता मिळून 12% योगदान ईपीएफ खात्यात केले जाते. कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने कर्मचाऱ्याइतकेच योगदान नियोक्ता देखील कंपनी द्वारे करतो. कर्मचाऱ्यांचे योगदान केवळ एकाच भागामध्ये जाते परंतु कंपनी दोन भागांमध्ये योगदान सुरु ठेवते. ईपीएफमधील योगदान 3.67% असते तर, ईपीएस खात्यातील योगदान 8.33% असते.
पेन्शन प्राप्तीसाठी कोणते नियम फॉलो करावे लागतील :
ईपीएफओ खाते धारकाला पेन्शन प्राप्तीसाठी ईपीएफमधील योगदानाचे दहा वर्षे पूर्ण केलेले महत्वाचे आहे. म्हणजेच कर्मचाऱ्याने एखाद्या कंपनीमध्ये सातत्याने दहा वर्ष कामाचे योगदान दिलेले असावे. समजा एखादा कर्मचारी 35 वर्ष लगातार ईपीएसमध्ये योगदान देत असेल तर, त्याला पेन्शन स्वरूपात किती रक्कम प्राप्त होईल.
अशा पद्धतीने पेन्शन कॅल्क्युलेट करा :
ईपीएस खातेधारकाला किती पेन्शन मिळणार हे एका फॉर्म्युल्यावर आधारित असते. हा फॉर्म्युला ( ईपीएस=सरासरी पगार x पेन्शनबल सर्विस /70 ). या फॉर्मुलाच्या मदतीने तुम्हाला पेन्शन किती मिळणार हे ठरते. सरासरी पगार म्हणजेच कर्मचाऱ्याचा बेसिक पगार होय. कॅल्क्युलेशनमध्ये तुमच्या बारा महिन्यांचा पगार गृहीत धरला जातो. आता यामध्ये जास्तीत जास्त पेन्शनबल सर्विस 35 वर्ष आहे आणि पेन्शन वेतन 15000 रुपये आहे तर, फॉर्म्युलानुसार 15,000X8.33=1250.
फॉर्म्युलानुसार किती पेन्शन मिळणार :
ईपीएस फॉर्म्युलानुसार पेन्शन मोजायची झाली तर, EPS = 15,000X35/70 =7,500 रुपये. म्हणजेच EPF खात्यातून कर्मचाऱ्याला जास्त प्रमाणात 7,500 तर कमीत कमी 1,000 रुपयांपर्यंत पेंशन मिळेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | EPF Pension Money Friday 13 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं