EPF Withdrawal | पगारदारांनो EPF च्या पैशांतून होम लोन फेडत आहात का; तुम्ही जे करताय ते योग्य आहे की अयोग्य, इथे जाणून घ्या

EPF Withdrawal | स्वतःचं घर खरेदी करण्याचं स्वप्न प्रत्येक तरुणाचं असतं. यासाठी बरेच लोक होम लोनचा पर्यायी निवडतात आणि दीर्घकाळासाठी लोनचे हफ्ते भरतात. परंतु होम लोनचे हप्ते दीर्घकाळासाठी भरावे लागतात ज्यामुळे व्याजाचे देखील अधिक पैसे फेडावे लागतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तीचा अर्धा पगार तर, EMI चे हप्ते फेडण्यातच जातो. यादरम्यान बहुतांश व्यक्ती EPF च्या माध्यमातून होम लोनचे पैसे फेडण्याचा देखील विचार करतात. परंतु ही गोष्ट तुमच्यासाठी योग्य आहे की अयोग्य आहे हे आज आम्ही सांगणार आहोत.
व्याजाशी निगडित ही गोष्ट लक्षात ठेवा :
1. इतर योजनांपेक्षा तुम्हाला ईपीएफ म्हणजेच एम्पलोयीज प्रॉव्हिडंट फंडमध्ये सर्वाधिक व्याजदर मिळते. परंतु बऱ्याचदा असं होतं की ईपीएफ वर मिळणारे व्याजदर हे होम लोनवर मिळणाऱ्या व्याजदरापेक्षा जास्त असेल तर, तुम्ही ती रक्कम प्री-पेमेंटसाठी वापरू शकता.
2. सध्याच्या घडीला ईपीएफ तुम्हाला 8.25% परतावा देते. दरम्यान बँकेतील अधिकारी तुम्हाला दहा टक्के किंवा 8.5% परतावा देतात. अशा स्थितीत तुमच्या होम लोनचे व्याजदर 9% टक्क्यांपर्यंत असेल तर, तुम्हाला होम लोनच्या प्री-पेमेंटवर लक्ष केंद्रित करावे लागेल.
3. ईपीएफच्या माध्यमातून होम लोन फेडण्यासाठी ते व्यक्ती देखील योग्य ठरू शकतात ज्यांना नुकतेच चांगल्या पगाराची नवीन नोकरी लागली आहे. म्हणजेच तुम्ही तरुण असाल तर, लवकरात लवकर तुमचा ईएमआय ईपीएफच्या माध्यमातून फेडला जात जाईल.
4. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा ती म्हणजे ईपीएफओ तुमच्या जमा रक्कमेच्या केवळ 90% रक्कम काढण्यास परवानगी देते. या गोष्टीसाठी देखील तुम्हाला एका नियमामध्ये परफेक्ट असणे गरजेचे आहे. तो म्हणजे तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये कामाचे एकूण 10 वर्ष योगदान दिलेले असावे.
होम लोनसाठी अशा पद्धतीने ईपीएफ खात्यातून पैसे काढा :
1. सर्वप्रथम ईपीएफओ ई-सेवा पोर्टलवर तुम्हाला लॉगिन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा युएएन नंबर टाकून इंटरवर क्लिक करावे लागेल.
2. त्यानंतर ऑनलाईन सर्विस या ऑप्शनवर क्लिक करा. त्याचबरोबर फॉर्म नंबर 31 भरून क्लेमसाठी तयार रहा.
3. त्यानंतर पुढील प्रोसेसमध्ये तुम्हाला तुमच्या बँक डिटेल्स व्हेरिफाय करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर तुम्ही कोणत्या कारणासाठी पैसे काढत आहात हे देखील तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे.
4. तुमच्याकडून जे डॉक्युमेंट्स मागितले जातील ते सर्व डॉक्युमेंट्स जमा करा.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | EPF Withdrawal Tuesday 17 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं