Post Office Saving | बँकांपेक्षा पोस्टात सेविंग अकाउंट उघडण्याचे जबरदस्त फायदे ठाऊक आहेत का, इथे घ्या योग्य माहिती

Post Office Saving | नोकरी करणारा प्रत्येक व्यक्ती पगारातील काही रक्कम सेविंग करण्याकरिता बँकेमध्ये सेविंग अकाउंट उघडतो. सध्याच्या काळात तर प्रत्येक व्यक्तीचे सेविंग अकाउंट असणे अत्यंत गरजेचे आहे. सेविंग अकाउंटमार्फत तुम्हाला तुमच्या पैशांची बचत करता येते. परंतु तुम्ही पोस्ट ऑफिस सेविंग अकाउंटबद्दल कधी ऐकलं आहे का.
आज आम्ही या बातमीपत्रातून बँकेच्या सेविंग अकाउंट त्याचबरोबर पोस्टाच्या सेविंग अकाउंटबद्दल स्पष्टीकरण देणार आहोत. ग्राहकांसाठी पोस्टाचे सेविंग अकाउंट उत्तम ठरेल की, बँकेचे दोघांमधील अंतर जाणून घेऊया.
मिनिमम बॅलन्स अमाऊंट :
प्रत्येक सेविंग अकाउंटची एक मिनिमम लिमिट असते. इतर बँकांच्या सेविंग अकाउंटमधील मिनिमम बॅलेन्सची लिमिट 1000 किंवा 1,500 रुपयांपर्यंत पाहायला मिळते. परंतु पोस्टाचं सेविंग अकाउंट त्यामानाने तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. कारण की यामध्ये मिनिमम बॅलन्सची अमाऊंट केवळ 500 रुपये आहे.
व्याजदराविषयी जाणून घ्या :
पोस्टाचे सेविंग अकाउंट बँकेतील सेविंग अकाउंटपेक्षा आणखीन एका कारणाने फायदेशीर ठरते. ते म्हणजे अकाउंटचे व्याजदर. तुम्हाला बँकेतील सेविंग अकाउंटच्या व्याजदरापेक्षा पोस्ट ऑफिस सेविंग अकाउंटमध्ये जास्त व्याजाचा फायदा अनुभवायला मिळतो. पोस्टाच्या सेविंग अकाउंटमध्ये 4% व्याजदर मिळते तर, बँकांमधून मिळणारे व्याजदर हे 3.5% ते 2.70 एवढे असते.
पोस्टाच्या सेविंग अकाउंटमध्ये मिळणाऱ्या सुविधांचा लाभ जाणून घ्या :
1. पोस्टाच्या सेविंग अकाउंटमध्ये खातं उघडल्यानंतर ग्राहकाला विविध प्रकारच्या सुविधांचा लाभ घेता येतो.
2. ज्यामध्ये ई बँकिंग सेवा, एटीएम कार्ड, चेकबुक, आधार लिंकिंग यांसारख्या अनेक सुविधांचा लाभ घेता येतो.
3. एवढेच नाही तर पोस्टाच्या सेविंग अकाउंटमधून ग्राहकांना मोबाईल बँकिंगची सुविधा देखील अनुभवायला मिळते. या सर्व सुविधा तुम्हाला बँकेच्या सेविंग अकाउंटमध्ये त्याचबरोबर पोस्टाच्या देखील सेविंग अकाउंटमध्ये पाहायला मिळते.
4. पोस्टाच्या योजना सरकारी योजना असतात. त्यामुळे तुम्हाला सुरक्षितता पूर्णपणे मिळेल याची खात्री करून घ्यावी.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Post Office Saving Thursday 19 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं