Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा - NSE: TATAPOWER

Tata Power Share Price | २०२४ हे वर्ष शेवटच्या टप्प्यात असून स्टॉक मार्केट गुंतवणूकदार नवीन वर्षात चांगल्या शेअर्सच्या शोधात आहेत. तसेच २०२५ हे वर्ष शेअर बाजारासाठी सकारात्मक ठरेल, अशी अपेक्षा आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी गुंतवणुकीसाठी ३ शेअर्स निवडले आहेत. हे ३ शेअर्स गुंतवणूकदारांना ३५ टक्केपर्यंत परतावा देऊ शकतात असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
Praj Industries Share Price
स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी प्राज इंडस्ट्रीज कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. प्राज इंडस्ट्रीज कंपनी शेअरमध्ये १६-१७ दिवसांचा कंसॉलिडेशन ब्रेकआऊट झाला आहे. आता प्राज इंडस्ट्रीज शेअर मोठ्या ब्रेकआऊटसाठी सज्ज होत आहे असे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. तज्ज्ञांनी प्राज इंडस्ट्रीज कंपनी शेअरसाठी 890 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच 800 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे.
KFin Tech Share Price
स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी केफिन टेक लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांच्या मते, डिमॅट खात्यांची संख्या वाढत असून, स्टॉक मार्केटविषयी जागरुकता वाढत आहे. परिणामी डिपॉझिटरी, ब्रोकिंग, मोमेंटम यांसारख्या कंपन्यांबाबत सकारात्मक संकेत आहेत. तज्ज्ञांनी केफिन टेक शेअरसाठी १७५० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच 1375 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवावा असा सल्ला देखील दिला आहे. तज्ज्ञांच्या मते केफिन टेक शेअर गुंतवणूकदारांना १५ ते २० टक्के परतावा देऊ शकतो.
Tata Power Share Price
मिरे ॲसेटने शेअरखान ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ कॉल दिला आहे. मिरे ॲसेटने शेअरखान ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरसाठी ५४० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ब्रोकरेजच्या मते हा शेअर गुंतवणुकदारांना सध्याच्या पातळीवरून ३५ टक्के परतावा देऊ शकतो. टाटा पॉवर कंपनी शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर 494.85 रुपये होता आणि नीचांकी स्तर 319.60 रुपये होता. टाटा पॉवर कंपनी शेअरने २०२४ मध्ये २१ टक्के परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Tata Power Share Price Wednesday 25 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं