Financial Planning | अपार सेविंग आणि पगारही संपणार नाही, बचतीचा हा फॉर्म्युला वापरा, बँक बॅलन्स भक्कम होईल

Financial Planning | सर्वसामान्य कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती कधी आपला महिन्याचा पगार होतोय आणि आपण गरजेच्या वस्तू खरेदी करतोय असं होतं. कारण की संपूर्ण कुटुंब केवळ एका व्यक्तीच्या पगारावर अवलंबून असतं. यामध्ये केवळ किराणा नाही तर, लाईट बिल, मुलांच्या शाळेची फी, पाणी बिल, रिचार्ज त्याचबरोबर राहिलेली उधारी यांसारख्या विविध गोष्टी आपण पगार हातात आल्याबरोबर करतो.
या गोष्टीमुळे पगार आपल्या जवळ कधी येतो आणि कधी संपून जातो याचा काहीच थांगपत्ता लागत नाही. अशा परिस्थितीत प्रत्येक पगारदार व्यक्तीने आपल्या महिन्याच्या पगाराचे आणि खर्चाचे एक नियमित बजेट बनवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये बचत, इच्छा आणि गरजा या तीन गोष्टींचे व्यवस्थित वर्गीकरण करता यायलाच पाहिजे. आज आम्ही तुम्हाला याबाबत सविस्तर माहिती सांगणार आहोत. परंतु सर्वप्रथम तुम्हाला 50:30:20 या उत्तम फॉर्म्युलाचा अर्थ समजून घेता यायला पाहिजे.
50 म्हणजे 50% रक्कम गरजांवर खर्च करणे :
माणसाची गरज म्हणजेच अन्न, वस्त्र आणि निवारा. सोबतच घर भाडे, गृह कर्जाचे ईएमआय, किराणा सामान यांसारखे विविध गोष्टींचा समावेश असू शकतो. त्यामुळे तुम्ही सर्वप्रथम पगारातील 50% रक्कम तुमच्या मूलभूत गरजांवरच खर्च केली पाहिजे. काही व्यक्तींसाठी लक्झरी मॉलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवण करणे या गोष्टी देखील गरजांमध्ये मोडतात. परंतु या दिखाव्याच्या गोष्टींवर तुम्हाला कमीत कमी पैसे खर्च करता आले पाहिजे.
30 म्हणजे 30% रक्कम तुमच्या इच्छांवर खर्च करा :
प्रत्येक व्यक्ती केवळ गरजांसाठीच नव्हे तर आपले छंद जोपासण्यासाठी त्याचबरोबर आपल्या आणि आपल्या कुटुंबीयांच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी देखील खराबाहेर खस्ता खात पैसे कमवतो. यामध्ये चित्रपट पाहणे, महिन्यातून एकदा किंवा दोनदा लॉंग टूरवर जाणे, ब्रँडेड वस्तू शूज आणि गॉगल्स खरेदी करणे यासारख्या विविध गोष्टींचा समावेश असू शकतो. तरीसुद्धा तुम्हाला हा संपूर्ण खर्च केवळ तुमच्या पगारातील 30% रक्कम एवढाच खर्च करायचा आहे.
20 म्हणजे 20% रक्कमेची बचत करणे :
बहुदा संपूर्ण गोष्टी आधीच करून बचतीसाठी एक रुपया देखील शिल्लक राहत नाही. परंतु तुम्ही 50 30 आणि 20 या फॉर्मुल्याचा अवलंब केला तर, तुम्ही पगारातील 20% रक्कम अवश्य बाजूला काढू शकता. ही 20% रक्कम तुम्हाला एखाद्या योजनेमध्ये किंवा एसआयपी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवायची आहे. जर तुम्ही गुंतवणुकीचे सातत्य ठेवले आणि या फॉर्म्युलाचा अवलंब केला तर, अगदी कमी पगारातून तुम्ही कोटींचा फंड तयार करू शकता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Financial Planning Tuesday 31 December 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं