BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL

BEL Share Price | सोमवार, 13 जानेवारी 2025 रोजी देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. सलग चौथ्या दिवशी बाजार जोरदार घसरला होता. प्रचंड विक्रीमुळे शेअर बाजार ७ महिन्यांच्या नीचांकी पातळीपर्यंत घसरला होता. एनएसई निफ्टी 345 अंकांनी घसरून 23,085 वर बंद झाला होता. तर बीएसई सेन्सेक्समध्ये 1048 अंकांची घसरण होऊन तो 76,330 वर पोहोचाल होता. या घसरणीत भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड या डिफेन्स कंपनीचा शेअर फोकसमध्ये आला आहे.
भारत कंपनीला नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला
भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्सचेंजला फायलिंगमार्फत माहिती देताना म्हटले आहे की, ‘भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड कंपनीला नवीन कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे. हा नवीन कॉन्ट्रॅक्ट ५६१ कोटी रुपयांचा असल्याची माहिती भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड कंपनीने दिली आहे.
नवीन कॉन्ट्रॅक्टचा तपशील
२३ डिसेंबर २०२५ रोजी भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड कंपनीला मिळालेल्या कॉन्ट्रॅक्टनंतरचा हा दुसरा कॉन्ट्रॅक्ट आहे, ज्याची किंमत ५६१ कोटी रुपये आहे. या कॉन्ट्रॅक्टनुसार कंपनीला दळणवळण उपकरणे, इलेक्ट्रो-ऑप्टिक्स, सॅटकॉम नेटवर्कचे अद्ययावतीकरण, रडार आणि फायर कंट्रोल सिस्टम इत्यादींचा पुरवठा करावा लागणार आहे. या कॉन्ट्रॅक्टमुळे कंपनीला चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत १०,३६२ कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाले आहेत.
शेअरने किती परतावा दिला
गेल्या पाच दिवसांत भारत इलेक्ट्रॉनिक शेअर 8.91 टक्क्यांनी घसरला आहे, तर महिनाभरात शेअर 17.90 टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या सहा महिन्यांत हा शेअर 21.80 टक्क्यांनी घसरला आहे. पण गेल्या 1 वर्षात शेअरने 37.37 टक्के परतावा दिला आहे. तर गेल्या 5 वर्षात या शेअरने 615.88% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्म गुंतवणूककारांना शेअरने 117,695.45% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | BEL Share Price Monday 13 January 2025 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं