IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC

IRFC Share Price | बुधवारी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. आता कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली आहे. आयआरएफसी कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, ‘आयआरएफसी कंपनीने झारखंडमधील लातेहार जिल्ह्यातील कोळसा ब्लॉकला वित्तपुरवठा करण्यासाठी सर्वात कमी बोली लावली (L1 बोलीदार) आहे. या अपडेटनंतर कंपनी शेअरवर सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
आयआरएफसी कंपनीला ३१६७ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळणार
इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्सचेंजला माहिती देताना म्हटले आहे की, ‘झारखंडमधील लातेहार जिल्ह्यातील बनहारडीह कोळसा ब्लॉकच्या विकासासाठी लागणारा ३१६७ कोटी रुपयांचा वित्तपुरवठा आयआरएफसी कंपनी करणार आहे. आयआरएफसी कंपनी झारखंड सरकारच्या टेंडरसाठी सर्वात कमी बोली लावणारी कंपनी ठरली आहे.
संयुक्त उपक्रमातून प्रकल्पाचे बांधकाम होणार
बनहारडीह कोळसा ब्लॉक प्रकल्प पत्रतु विद्युत उत्पादन निगम लिमिटेड (PVUNL) द्वारे बांधला जात आहे. पत्रतु विद्युत उत्पादन निगम लिमिटेड हा NTPC लिमिटेड आणि झारखंड बिजली वितरण निगम लिमिटेड यांचा संयुक्त उपक्रम (JV) आहे. त्यांनतर हा प्रोजेक्ट पूर्ण केला जाणार आहे.
आयआरएफसी शेअर विक्रमी उच्चांकावरून ६९ टक्क्यांनी घसरला
मंगळवारी आयआरएफसी शेअर ५.७२ टक्क्यांनी वाढून १३५.७५ रुपयांवर पोहोचला होता. आयआरएफसी शेअरची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी 229 रुपये होती आणि शेअरची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी 116.65 रुपये होती. म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी शेअर त्याच्या विक्रमी उच्चांकावरून ६९ टक्क्यांनी खाली घसरला आहे.
5 वर्षात 453 टक्क्यांचा परतावा
शेअरच्या कामगिरीवर नजर टाकली तर, गेल्या एका आठवड्यात आयआरएफसी शेअर 4.08 टक्क्यांनी घसरला आहे. एका महिन्यात शेअर 13.70 टक्के घसरला आहे. गेल्या ६ महिन्यांत हा शेअर 36.59 टक्क्यांनी घसरला आहे. तसेच, गेल्या एका वर्षात शेअरने फक्त 5.43 टक्के परतावा दिला आहे. तर गेल्या २ वर्षात आयआरएफसी शेअरने सुमारे ३०० टक्क्यांचा परतावा दिला आहे आणि ३ वर्षात आयआरएफसी शेअरने 453 टक्के परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | IRFC Share Price Wednesday 15 January 2025 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं