Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER

Reliance Power Share Price | शुक्रवारी दिवसभरातील चढ-उतारानंतर स्टॉक मार्केट घसरणीसह बंद झाला होता. शुक्रवारी सेन्सेक्समध्ये 780 अंकांनी घसरण होऊन तो 76,263 वर बंद झाला होता. तसेच, निफ्टी देखील २११ अंकांच्या घसरणीसह २३,१०० वर बंद झाला होता. एका बाजूला शेअर बाजार घसरत असला तरी रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत दिसत आहेत.
रिलायन्स पॉवर कंपनी शेअरची सध्याची स्थिती
शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी रिलायन्स पॉवर कंपनी शेअर 2.31 टक्क्यांनी वाढून 42.15 रुपयांवर पोहोचला होता. रिलायन्स पॉवर कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 53.64 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 19.40 रुपये होता. रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 16,891 कोटी रुपये आहे. रिलायन्स पॉवर शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवरून जवळपास ३० टक्क्यांनी घसरला आहे.
रिलायन्स पॉवर लिमिटेडची उपकंपनी करणार मोठी गुंतवणूक
अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपची रिलायन्स एनयू सनटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील सौर ऊर्जा प्रकल्पात 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती स्टॉक एक्सचेंजला दिली आहे. रिलायन्स एनयू सनटेक प्रायव्हेट लिमिटेड ही रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. कंपनीने बिल्ड-ओन-ऑपरेट तत्त्वावर हा मेगा प्रोजेक्ट हाती घेतला आहे. हा प्रकल्प आशियाखंडातील सर्वात मोठा सौर आणि बॅटरी ऊर्जा स्टोअरेज प्रकल्प असेल असा दावा देखील करण्यात आला आहे.
शेअरबाबत तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले
स्टॉक मार्केट तज्ज्ञ ध्वनी पटेल यांनी रिलायन्स पॉवरबाबत सल्ला देताना म्हटले की, ‘मागील १ वर्षापासून रिलायन्स पॉवर कंपनी शेअर्स तेजीत होता. या कालावधीत शेअरमध्ये 41.21 टक्क्यांची वाढ झाली आहे. रिलायन्स पॉवर कंपनी स्टॉक अलीकडे 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीपासून 30 टक्क्यांनी घसरल्यानंतर चॅनेल सपोर्ट लेव्हलवरून पुनरागमन केले आहे. हा पॉवर स्टॉक काही काळ प्रमुख तांत्रिक निर्देशांक बोलिंजर बँडच्या खाली घसरला होता आणि नंतर या शेअरने पुन्हा तेजी घेतल्याचे ध्वनी पटेल यांनी म्हटले आहे.
रिलायन्स पॉवर शेअर टार्गेट प्राईस
ध्वनी पटेल यांनी पुढे म्हटलं की, ‘रिलायन्स पॉवर शेअर्समध्ये सध्या नव्याने खरेदीचा ट्रेंड दिसत आहे. हा ट्रेंड रिलायन्स पॉवर शेअर्समधील आगामी तेजीचे संकेत देते आहे. त्यामुळे आगामी काळात हा पॉवर शेअर तेजीने परतावा देऊ शकतो आणि त्यांनतर ४८ रुपयाची पहिली टार्गेट प्राईस गाठेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Reliance Power Share Price Friday 17 January 2025 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं