Post Office Scheme | पोस्टाची प्रत्येक महिन्याला नफा मिळवून देणारी फायद्याची योजना, महिन्याला मिळतील 9250 रुपये

Post Office Scheme | प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात एखादा आर्थिक स्त्रोत शोधतच असतो. आपल्या भविष्याचा विचार करून अनेक व्यक्ती ठिकठिकाणी पैसे देखील गुंतवतात. अशीच एक पोस्टाची ‘मधली इन्कम योजना’ आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही यामध्ये अगदी कमी गुंतवणूक करून देखील भरपूर नफा मिळवू शकता. आज आपण पोस्टाच्या मंथली इन्कम योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
योजनेचे फायदे जाणून घेऊ :
पोस्ट ऑफिस मंथली इन्कम योजना ही सरकारद्वारे चालवली जाणारी योजना आहे. पोस्टाच्या सर्वच योजना सरकारी असतात. पोस्टाच्या सर्व योजना तुम्हाला सुरक्षा प्रदान करतात. तुमचे पैसे कुठेही चोरीला जाणार नाहीत किंवा कोणीही तुमच्या पैशांची गल्लत करणार नाही. पोस्टाची मंथली इन्कम योजना ही देखील एक अल्पबचत योजना आहे. जी वार्षिक आधारावर 7.4% व्याजदर प्रदान करते.
योजनेची खासियत म्हणजे, एकल गुंतवणुकीत 9 लाख रुपये पैसे गुंतवले जातात तर, संयुक्त खात्यामध्ये 15 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते आणि म्हणूनच छोट्या गुंतवणुकीपासून ते मोठी गुंतवणूक करणाऱ्यांपर्यंत ही योजना उपलब्ध आहे.
खाते उघडण्याचे नियम :
1. लहान मुलं देखील या योजनेचा भाग होऊ शकतात. यासाठी 10 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मुला मुलींचे खाते त्यांचे आई वडील उघडू शकतात.
2. त्याचबरोबर कोणतीही प्रौढ व्यक्ती आपल्या जोडीदाराबरोबर किंवा एकल पद्धतीने पोस्टाच्या मधली इनकम योजनेमध्ये खाते उघडून घेऊ शकते.
3. तुम्ही संयुक्त खाते उघडत असाल तर, दोन्ही व्यक्तींचा पैशांवर समान अधिकार असतो. योजनेमध्ये कमीत कमी पैसे गुंतवणुकीची रक्कम 1000 रुपयांपर्यंत दिली.
योजनेचे व्याजदर :
पोस्ट ऑफिस मंथली इनकम योजना ही ज्या व्यक्तींना महिन्याला एक ठराविक रक्कम पेन्शन स्वरूपात हवी असेल त्याचबरोबर ज्यांना भविष्यासाठी पैसे जमा करून प्रत्येक महिन्याला एक रक्कम हातात यावी असं वाटत असणाऱ्या व्यक्तींसाठी ही योजना प्लॅन केली गेली आहे. सध्या योजनेचे व्याजदर 7.4% आहे. दरम्यान व्याजदराची रक्कम एकूण 12 विभागांमध्ये विभागण्यात येते आणि प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यात ट्रान्सफर देखील होते. ज्या व्यक्ती संयुक्त खात्यात 15 लाख रुपयांची रक्कम गुंतवत असतील त्यांना वार्षिक आधारावर 1,11,000 रुपये मिळतील आणि महिन्याला 9250 रुपयांची एक रक्कमी रक्कम मिळेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Post Office Scheme Wednesday 29 January 2025 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं