SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 7 म्युच्युअल फंडांची यादी सेव्ह करा, वेगाने वाढेल पैशाने पैसा, नोकरदारांचे खास पसंती

SBI Mutual Fund | सध्याच्या काळात बहुतांश तरुण वर्ग आपल्या पगारातील काही भाग शेअर बाजारात गुंतवण्याचा विचार करतात. शेअर बाजारातून तुम्हाला इतर कोणत्याही योजनेपेक्षा सर्वाधिक परतावा मिळतो. जबरदस्त नफा जरी मिळत असला तरीही शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. तुमच्यापैकी बऱ्याच व्यक्तींना ही गोष्ट ठाऊक असेल की 2024 वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यापासून बाजारातील घसरण झपाट्याने वाढत चालली आहे. तरीसुद्धा काही असे म्युच्युअल फंड आहेत ज्यांनी आपला गुंतवणूकदारांना नफाच नफा मिळवून दिला आहे.
बाजारातील म्युच्युअल फंडांत त्याचबरोबर शेअर्समध्ये पैसे गुंतवणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. इथे प्रत्येक व्यक्तीला करोडपती व्हायचं आहे यादृष्टीने शेअर बाजारात गुंतवणूक करणे फायद्याचे वाटते. मागील 10 वर्षांपासून या 7 टॉप म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना बाजारात घसरण असून सुद्धा बक्कळ पैसा कमावून दिला आहे. आज या बातमीपत्रातून आम्ही तुम्हाला म्युच्युअल फंडांची यादी सांगणार आहोत.
कोणते आहेत टॉप 7 म्युच्युअल फंड :
1. आयसीआयसीआय प्रूडेन्शियल ब्लूचिप फंड :
आयसीआयसीआयच्या या जबरदस्त फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना मागील दहा वर्षांत 12.53% परतावा मिळवून दिला आहे. हा सरासरी परतावा असून या फंडाची व्हॅल्यू 61714.99 कोटी रुपये आहे.
2. एचडीएफसी लार्ज कॅप फंड :
एचडीएफसीच्या लार्ज कॅप फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना 11.10% परतावा मिळवून दिला आहे. या फंडाची AUM व्हॅल्यू 4,847.82 कोटी रुपये आहे.
3. कोटक ब्लूचिप फंड :
कोटक ब्ल्यूचिप फंडाने देखील आपल्या गुंतवणूकदारांना भरभक्कम परतावादी आहे. मागील दहा वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 11.24% दराने परतावा दिला आहे. या फंडाची AUM व्हॅल्यू 9,025.47 कोटी रुपये आहे.
4. एडलवाईस लार्ज कॅप फंड :
एडलवाईस लार्जू कॅप फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना मागील दहा वर्षांमध्ये 11.40% परतावा मिळवून दिला आहे. एडलवाईस फंडाची व्हॅल्यू 1078.11 कोटी रुपयांची आहे.
5. एसबीआय ब्ल्यूचीप फंड :
एसबीआय ब्लूचिप फंडाने गेल्या दहा वर्षांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना 11.62% परतावा दिला आहे. या फंडाची व्हॅल्यू 48062.06 कोटी रुपये आहे.
6. कॅनरा रोबेको ब्लूचिप इक्विटी फंड :
कॅनरा रोबेको ब्लूचिप इक्विटी फंडाने 10 वर्षातील रेकॉर्डमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना 12.07% परतावा मिळवला आहे. या फंडाची फंड वॅल्यू 14,196.78 कोटी रुपयांची आहे.
7. निप्पॉन इंडिया लार्ज कॅप फंड :
निपोन इंडिया लार्ज कॅप फंडाने 12.46% परतावा मिळवून दिला आहे. हा परतावा मागील दहा वर्षांच्या तुलनेत मिळाला आहे. या फंडाची फंड व्हॅल्यू 34517.63 कोटी रुपये आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | SBI Mutual Fund Saturday 01 February 2025 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं