मनसेकडून जीवनावश्यक वस्तूंचे ६ ट्रक सांगली-कोल्हापूरच्या दिशेने रवाना

मुंबई : कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यात सांगलीतील बचावकार्यात तब्बल १६ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना देखील घडली. लाखो लोकांचे घरदार आणि संपूर्ण संसाराचं उध्वस्त झाले आहेत. दरम्यान, मदतीचा ओघ संपूर्ण राज्यातून सुरु झाला आहे तर दुसऱ्याबाजूला उशिरा का होईना, पण प्रशासनाकडून बचाव कार्य देखील युद्धपातळीवर सुरु असून, त्यात अनेक स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे.
त्यात अनेक राजकीय पक्षांनी देखील जवाबदारीचे भान राखत शक्य तेवढी मदत पोहोचविण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशापूर्वीच मनसेचे कोल्हापूर आणि सांगलीतील स्थानिक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मदतकार्यात सामील झाला होते. तर दुसऱ्याबाजूला इतर शहरातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गरजेच्या सामानाची आणि निधीची जमवाजमव सुरु केली होती. त्याच्याच भाग म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सांगली आणि कोल्हापूरच्या दिशेने तब्बल ६ ट्रक महत्वाचं साहित्य घेऊन रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे या साहित्यांवर कोणतेही स्टिकर्स पक्षाने लावलेले नाहीत. दरम्यान, पूरग्रस्त परिस्थितीमुळे सांगली आणि कोल्हापूरच्या दिशेने जाणारे मर बंद ठेवण्यात आल्याने मदत पोहोचवण्यास अडचण येत होती.
मात्र परिस्थिती थोडीफार पूर्वपदावर येत असल्याने मदत साहित्य घेऊन मनसेने ट्रक सोडण्यास सुरुवात केली आहे. तत्पूर्वी वाहतूक बंद झल्याने अनेक वाहन पुणे आणि इतर ठिकाणी अनेक दिवस अडकून पडली होती. त्यांच्या देखील जेवणाची सोया मनसेने पुण्यात करून दिली होती. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे मदत कार्यात उतरली असून, सांगलीकरांना आणि कोल्हापूरकरांना त्यांचं आयुष्य पूर्वपदावर येई पर्यंत खूप वेळ लागणार आहे आणि तो पर्यंत पक्ष शक्य ती मदत वेळोवेळो पोहोचवत राहील असं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
अलमट्टी धरणामधून साडेचार लाख क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने कोल्हापुरात दोन फूट पाणी पातळी कमी झाल्याने पूरग्रस्तांना किंचीत दिलासा मिळाला आहे. पूरग्रस्तांसाठी ६० हून अधिक स्वयंसेवी संस्था कार्यरत असून मदतीचा प्रचंड ओघ सुरू झाला आहे. याउलट सांगलीमध्ये परिस्थिती आहे. मदतकार्याचा धडाका सुरू असला तरी, पूरस्थिती अद्यापही आटोक्यात येण्यास वेळ लागणार आहे.
कोल्हापूरपेक्षाही आता शिरोळ तालुक्याची परिस्थिती अजूनही थोडी गंभीर राहिल्याने प्रशासनाने जिल्ह्यातूनही बोटी तेथे मागवल्या आहेत. कोल्हापूर शहर, चिखली, आंबेवाडी येथील पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणावर मदत सुरू झाली आहे. अन्नधान्य, तयार अन्न, औषधे, कपडे, सॅनिटरी नॅपकिन इथंपासून ते अगदी पेस्ट, ब्रशपर्यंत अनेक जीवनोपयोगी वस्तू पुरवल्या जात आहेत.
सांगलीत जिल्हाधिकाऱ्यांच्या घराबाहेरही पाणी साठलं होतं. ते हळूहळू ओसरु लागलं आहे. सांगलीत पावसाने काहीशी उसंत घेतली आहे त्यामुळे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. कोल्हापुरात मात्र पावसाचा कहर थोड्याफार प्रमाणात अजून सुरुच आहे. या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात ते पूरग्रस्त नागरिकांच्या भेटी घेणार आहेत. त्यांची विचारपूस करून शक्य ती मदत करणार आहेत. या भेटीत त्यांच्या सोबत विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे हेही असणार आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं