वंचित आघाडीचं निवडणूक चिन्ह 'गॅस सिलेंडर'; विधानसभेत तरी शेगडी पेटणार का?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत कपबशी या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीची कपबशी औरंगाबाद वगळता सर्वच मतदार संघात फुटली होती. मात्र त्यानंतर देखील प्रकाश आंबेडकरांनी त्याच निवडणूक चिन्हासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. त्याच अनुषंगाने त्यांनी प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांना देखील विनंती केली होती. मात्र नवं चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवणे अत्यंत कठीण काम असल्याने तो संवाद पूर्णत्वास जाऊ शकला नव्हता.
मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला निवडणूक आयोगाने नवं चिन्ह दिलं आहे. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकरांपुढे नवं आव्हान उभं राहिलं आहे. दरम्यान पुढील महिन्यात निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा घोषित करु शकते. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ ऑक्टोबर अखेरीस संपत आहे. त्यामुळे त्यापूर्वी निवडणुका होतील. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सर्व पक्ष तयारी करत असताना, निवडणूक आयोगाने देखील आपली तयारी सुरु केली आहे.
निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना चिन्हांचं वाटप सुरु केलं आहे. निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलेंडर हे चिन्ह दिलं आहे. तर संभाजी ब्रिगेडला शिलाई मशीन हे चिन्ह मिळालं आहे. याशिवाय मराठा मोर्चानंतर स्थापन झालेल्या महाराष्ट्र क्रांती सेना या पक्षाला हिरा हे चिन्ह मिळालं आहे. आगामी निवडणुकीत या पक्षांनी उमेदवार उतरवल्यास त्यांचे चिन्ह गॅस सिलेंडर आणि शिलाई मशीन असेल. राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षांची निवडणूक चिन्हं यापूर्वीचीच असतील. त्यामुळे वंचित आघाडीला नव्याने प्राप्त झालेल्या गॅस सिलेंडर या चिन्हाने आगामी विधानसभा निवडणुकीत राजकारणाची शेगडी पेटणार का ते पाहावं लागणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं