कारण उद्धव ठाकरे म्हणाले, ‘राणे परत आले तर मी घर सोडीन’

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री, ‘प्रहार’चे संपादकीय सल्लागार, खासदार नारायण राणे यांचे आत्मकथन असलेल्या ‘झंझावात’ या मराठी पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते, No Holds Barred या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभगृहात शुक्रवारी सायंकाळी एका शानदान समारंभात झाले. या कार्यक्रमास राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर, सांस्कृतिक व मराठी भाषा मंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, खा. सुनील तटकरे, आ. कालिदास कोळंबकर, दोन्ही पुस्तकांचे संपादक प्रियम मोदी, मधुकर भावे, सौ. निलमताई राणे, निलेश राणे, आ. नितेश राणे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात नारायण राणे यांनी आत्मचरित्राविषयी बोलताना त्यातील काही ठळक बाबींवर भाष्य केले. राणे म्हणाले, हे पूस्तक लिहीताना मी खूप काळजी घेतली आहे. वादग्रस्त मुद्दे गाळले असल्याचे राणेंनी सांगीतलं. शिवसेनेत असताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं आपल्यावर खूप प्रेम होतं. शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून सगळ्या जबाबदा-या पार पाडल्या. तेव्हाचजी शिवसेना आणि आत्ताची सेना यामध्ये जमीन आकाश एवढा फरक आहे. आम्ही पक्ष वाढवायला, वाचवायला काम केलं. मात्र आताचे शिवसैनिक कमर्शिअल झाले आहेत. ते ग्राऊंड लेवलवरचंम काम करू शकत नाही. शिवसेनेत आता काही नाही आता सगळं संपलं आहे, असे राणे म्हणाले.
शिवसेनेसोबत भाष्य करताना भावूक होत नारायण राणे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनीच मला घडविले, मार्गदर्शन केले. अंगात भिनवले. भाषण कसे करायचे ते शिकवले. त्या काळी वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्यासारखे नेते सत्तेत होते. त्या काळात शिवसेना वाढणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. मात्र, तेव्हा जीवाला जीव देणारे शिवसैनिक होते. बाळासाहेबांनी आम्हाला मनाचा मोठेपणा ठेवा अशी शिकवण दिली. मनाचा मोठेपणा दाखवला की माणूस मोठा होतो ही शिकवण त्यांनी आम्हाला दिली. ती मी जोपासली म्हणून लोकांसाठी काही करू शकलो. आई-वडिलांनी मला जेवढे प्रेम दिले नाही तेवढे प्रेम बाळासाहेबांनी दिले.
त्याचप्रमाणे शिवसेनेला सोडताना बाळासाहेबांना ६ पानी पत्र लिहिलं होतं. ते पत्र त्यांनी वाचल्यानंतर त्यांचा फोन आला आणि नारायण रागावला का, एकदा ये. पण तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले राणे परत आले तर मी घर सोडीन असं विधान केले होते. असे राणेंनी यावेळी सांगीतले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं