आठवण! २००५ मध्ये अमित शहा देखील CBI पासून ४ दिवस लपून बसले होते

नवी दिल्ली : सध्या माजी पी चिदंबरम यांच्या सीबीआय अटकेची चर्चा रंगली असली तरी २००५ साली अशीच वेळ सध्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचावर आली होती. अमित शहा गुजरातचे गृहराज्यमंत्री असताना ते देखील तब्बल सीबीआयच्या दबावाने तब्बल ४ दिवस अज्ञातस्थळी लपून बसले होते. त्यावेळी देखील अशाच घटना घडल्या होत्या जशा पी चिदंबरम यांच्या बाबतीत घडत आहेत.
२००५ मध्ये झालेल्या सोहराबुद्दीन एन्काऊंटर केसमध्ये २५ जुलै २०१० मध्ये अमित शहांना सीबीआयने खूप धावपळ करत अटक केली होती. सोहराबुद्दीन केसमध्ये त्यावेळी हायकोर्टाने अमित शहांना जामीन नाकारला होता. यामुळे सीबीआय अमित शहांना अटक करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेली होती. मात्र, शहा चुणूक लागताच घरातून पळून अज्ञातस्थळी लपले होते. तोच लपंडाव तब्बल ४ दिवस गुजरातमध्ये सुरु होता. यानंतर ते थेट गांधीनगर येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात बैठकीला आले आणि तेथेच त्यांना अटक करण्यात आली. मागील दोन दिवसांपासून नेमका असाच घटनाक्रम तेव्हाचे केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांच्यावर आली आहे.
CBI ला २५ जुलै पर्यंत सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्याची मुदत न्यायालयाने आखून दिली होती. त्यानंतर अमित शहांविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर गुजरातच्या तत्कालीन नरेंद्र मोदी सरकारच्या गृहमंत्रीपदाचा अमित शहा यांनी लगेच राजीनामा दिला होता. २००५ साली सोहराबुद्दीन हैदराबादहून महाराष्ट्रातील सांगलीला बसने प्रवास करत येत होता. त्यावेळी वाटेतून त्याला गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर सोहराबुद्दीनचा फेक एन्काऊन्टर केल्याचा, अपहरण, खंडणी असे आरोप अमित शहांवर होते. तसेच या एन्काऊंटरनंतर ३ दिवसांनी त्याची पत्नी कौसर बीला ठार करण्यात आले होते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं