खरा हिंदू मी, हनुमान चालिसा, वेद-पुराण सर्व येतं; हिंदू आदित्य ठाकरेंना सांगा बोलायला

इंदापूर: राष्ट्रवादी काँग्रेसची सध्या राज्यभर शिवस्वराज्य यात्रा जोरदारपणे सुरु आहे. आमदार-खासदारांच्या फुटीकडे दुर्लक्ष करत पक्षाने संपूर्ण ग्रामीण भाग पिंजून काढला आहे. त्याचाच भाग म्हणजे राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा इंदापूरमध्ये सुरु होती, त्याला स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यात विशेष गाजलं ते अमोल मिटकरी यांचं तडाखेबंद भाषण, ज्यामध्ये त्यांनी भाजप शिवसेनेची पिसं काढली.
मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या सभांमध्ये भगवा देखील दिसू लागल्याने सत्ताधाऱ्यांनी मोठा थयथयाट केल्याचे पाहायला मिळाले. नेहमीच मुस्लिम केंद्रित राजकारण करणारी राष्ट्रवादी अचानक भगव्याच्या प्रेमात कशी पडली अशी टीका भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी केली होती. मात्र अमोल मिटकरी यांनी तडाखेबंद भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते पुरातन काळातील हिंदू-मुस्लिम व्यक्तींचा पाढाच भाषणात वाचला आणि स्वार्थी हिंदुत्ववाद्यांना तोंडघशी पडल्याचं पाहायला मिळालं.
सध्या युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची देखील राज्यभर जनशीर्वाद यात्रा असून त्यांचा सर्वाधिक भर हा भगवा आणि हिंदुत्व याच विषयांवर आहे. त्यालाच अनुसरून अमोल मिटकरी यांनी हिंदुत्व विषयावरून धडाकेबाज भाषण देत शिवसेनेच्या हिंदुत्वावरून अनेक प्रश्न उपस्थित केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना अमोल मिटकरी म्हणाले की, खरा हिंदू मी आहे, कारण मला हिंदूंनाच इतिहास माहिती आहे आणि मी हनुमान चालिसा, वेद-पुराण सर्वकाही बोलू शकतो, पण आता तेच आदित्य ठाकरेंना सांगा बोलायला, माझं ओपन चॅलेंज आहे त्यांच्यातील हिंदूला. त्यामुळे त्यांनी आम्हाला धर्माविषयी आम्हाला शिकवू नये असा टोला त्यांनी आदित्य ठाकरेंना लगावला.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं