मित्रपक्ष: भाजपने मेटेंचं राजकीय अस्तित्व संपवलं; चौथा समर्थक जिल्हा परिषद सदस्य सुद्धा भाजपात

बीड: बीड जिल्ह्यात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्यातील सख्य संपूर्ण राज्याला माहित आहे. जिल्हा परिषदेतील कारभाराच्या तक्रारींवरुन मेटेंनी मुख्यमंत्र्यांचे दार ठोठावले आणि पुन्हा मेटे-मुंडे यांच्यात दुरावा निर्माण झाला. आता हाच राजकीय दुरावा बीड जिल्ह्याच्या राजकारणाचा पुढचा अंक ठरवणार आहे.
पंकजा मुंडेंनी विनायक मेटे यांना शह देत शिवसंग्रामच्या चौथ्या जिल्हा परिषद सदस्याला देखील भारतीय जनता पक्षात घेतले आहे. हा विनायक मेटेंना मोठा धक्का मानला जात आहे. भारत काळे यांनी गुरुवारी मुंबईत रॉयलस्टोनवर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर काही दिवसांनीच पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांच्यात राजकीय वाद सुरु झाले. स्वतंत्र जिल्हा परिषद निवडणुक लढविणाऱ्या शिवसंग्रामचे चार सदस्य विजयी झाले. जिल्हा परिषद सत्तारोहणाच्या निमित्ताने पुन्हा दोघांमध्ये राजकीय दिलजमाई होऊन जिल्हा परिषदेत शिवसंग्रामच्या जयश्री मस्के यांना उपाध्यक्ष मिळाले. परंतु, दोघांमधील राजकीय संघर्षाचा दुसरा पार्ट देखील जिल्हा परिषदेच्या कारभारामुळेच सुरु झाला.
शिवस्मारक समितीचे प्रमुख आमदार विनायक मेटे आणि पंकजा मुंडे यांच्यातील मतभेद सर्वश्रुत आहेत. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीनंतर मेटे आणि पंकजा यांच्यातील मतभेत वाढले होते. परंतु, बीड जिल्हा परिषदेत सत्ता मिळविण्यासाठी पंकजा यांनी मेटेंच्या चार सदस्यांना सोबत घेत भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवला होता. तसेच मेटेंसोबतचा वाद मिटल्याचे स्पष्ट करून शिवसंग्रामच्या जयश्री म्हस्के यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद दिले होते. परंतु, काही दिवसांतच पंकजा यांनी म्हस्के यांना भारतीय जनता पक्षाकडे वळवले. त्यापोठापाठ शिवसंग्रामचे दोन सदस्य अशोक लोढा आणि विजयकांत मुंडे देखील भारतीय जनता पक्षामध्ये दाखल झाले.
पंकजा यांनी शिवसंग्रामचे तीन सदस्य आपल्याकडे घेत मुंडे मेटेंना जोरदार धक्का दिला. या धक्क्यांमुळे नाराज झालेल्या मेटेंनी लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाला असलेला पाठिंबा काढून घेतला. दरम्यान बीड विधानसभा मतदारसंघासाठी विनायक मेटे इच्छूक असून शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर यांनीही तयारी सुरू केली आहे. परंतु, या जागेसाठी पंकजा मुंडे यांनी राजेंद्र म्हस्के यांच्या रुपाने भारतीय जनता पक्षासाठी पर्याय उपलब्ध करून ठेवला आहे. तसेच मेटेंकडे एकमेव जिल्हा परिषद सदस्य असलेले भारत काळे यांनाही भारतीय जनता पक्षामध्ये घेतले. त्यामुळे जिल्हा परिषदेतील मेटेंच्या शिवसंग्रामचे अस्तित्व संपुष्टात आले असून विधानसभा निवडणुकीपूर्वी मेटेंना हा मोठा धक्का मानला जात आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं