नाशिक: बनावट नोटा प्रकरणातील आरोपी छबू नागरेचा शिवसेनेत प्रवेश

नाशिकः राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांचा त्यात सर्वात मोठा समावेश आहे. दिग्गज नेत्यांना थेट मातोश्री आणि वर्षा निवासवर प्रवेश दिले जाती आहेत. त्यात अनेक ठिकाणी कोणतीही तत्व आणि पार्श्वभूमी न पाहता केवळ निवडणूक जिंकायच्याच या उद्देशाने प्रवेश देणं सुरु आहे.
तसाच काहीसा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडला आहे.राष्ट्रवादी कॉग्रेसचा विवादित कार्यकर्ता छबू नागरे याने अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला आहे. छबू नागरे बनावट नोटा प्रकरणी काही काळ अटकेत होता. पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे छबू नागरे याचा खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश देण्यात येणार होता. मात्र प्रसार माध्यमांना सुगावा लागल्याने खासदार संजय राऊत यांनी या पक्षप्रवेशाकडे पाठ फिरवली.
कारण छबू नागरे बनावट नोटा प्रकरणी सध्या जामिनावर आहे. सदर गुन्हा हा अत्यंत गंभीर समजला जातो आणि त्यामुळे प्रसार माध्यमांमध्ये पडसाद उमटण्याची शक्यता असल्याने आणि वाद टाळण्यासाठी खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा काही पदाधिकाऱ्यांनी जाणूनबुजून टाळल्याचे म्हटले जातं आहे.
नाशिकः राष्ट्रवादी कॉग्रेसचे कार्यकर्ते छबू नागरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. नागरे बनावट नोटा प्रकरणी काही काळ अटकेत होता. सध्या जामिनावर आहे यामुळेच शिवसेना नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा हा काही पदाधिकाऱ्यांनी जाणूनबुजून टाळला pic.twitter.com/bnSEs7nDYt
— Sakal Nashik (@SakalNashik) September 5, 2019
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं