विधानसभा निवडणूक: मोदींच्या हस्ते मुंबई मेट्रो मार्ग आणि मेट्रो भवनाचे भूमिपूजन

मुंबई : महामुंबईचे संपर्कजाळे वाढविणाऱ्या मेट्रो प्रकल्पाच्या विस्ताराचा शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. यावेळी तीन नवीन मेट्रो मार्ग आणि मेट्रो भवनाचे भूमिपूजन तसेच पहिल्या कोचचे आणि बाणडोंगरी मेट्रो स्थानकाचे उद्घाटनदेखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) मेट्रो मार्ग १०, वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो मार्ग ११ आणि कल्याण ते तळोजा मेट्रो मार्ग १२ असे मेट्रोचे तीन नवे मार्ग मुंबई, नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्य़ालाही कवेत घेणार आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या या तीन नवीन मेट्रो मार्गाना राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. या तीन नवीन मार्गामुळे मेट्रोच्या जाळ्यात ४२ कि.मी.ची वाढ होईल.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा हा दौरा असून, मेट्रोच्या तीन नवीन मार्गांमुळे मुंबई महानगर क्षेत्रातील नागरिकांना मुंबई शहर व उपनगरात येजा करण्यासाठी प्रभावी वाहतूक सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. मराठवाड्यातील औरंगाबादच्या भेटीतही त्या भागातील प्रश्नांबाबत पंतप्रधान मोदी हे भाष्य करतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
या तीन मेट्रो मार्गिकांसह मेट्रो भवनाचेही पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. १५४ मीटर उंच ३२ मजल्यांच्या या इमारतीमधून मुंबई आणि महानगर प्रदेशामध्ये भविष्यात निर्माण होणाºया ३३७ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकांवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. बीकेसीमध्ये मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत बनवण्यात आलेला पहिला मेट्रो कोच प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. हा अत्याधुनिक कोच बनवण्यासाठी सर्वसाधारणपणे ३६५ दिवस लागतात. मात्र हा कोच केवळ ७५ दिवसांमध्ये बनवण्यात आला. प्राधिकरणाने अशा प्रकारचे पाचशेपेक्षा जास्त कोच दहिसर ते डी.एन. नगर या मेट्रो-२ अ आणि अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) या मेट्रो-७ मार्गिकांच्या प्रवाशांसाठी मागविले आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं