आठवण! चांद्रयान-१ मोहिमेच्या दशकपूर्ती वेळी मोदींनी देशाला सर्जिकल स्ट्राइकमध्ये गुंतवलं होतं: सविस्तर

नवी दिल्ली: सध्या चांद्रयान २ या मोहिमेवरून देशातील वातावरण भावुक करून सोडण्यात आले आहे. चांद्रयान २ मोहिमेतील विक्रम लॅण्डरचा इस्रोशी अखेरच्या क्षणी संपर्क तुटला आणि सर्वत्र शांतता पसरली. त्यात मोदी आधीच इस्रोच्या कार्यालयात देशाला संबोधित करण्यासाठी दबा धरून बसले होते. वास्तविक हे तेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत ज्यांच्या सरकारने चांद्रयान २ चं यशस्वी उड्डाण झाल्यानंतर इस्रोतील वैज्ञानिकांचे वेतन कमी केले होते आणि यावर इस्रोतील वैज्ञानिकांनी नाराजी व्यक्त करत पंतप्रधान कार्यालयाकडे स्वतःच्या भावना पत्राद्वारे पोहोचवल्या होत्या.
मात्र आज तेच मोदी वैज्ञानिकांना अलिंगन देत भावनिक आधार देताना दिसले. वास्तविक मार्केटिंग आणि प्रतिमा उंचावण्याची एकही नामी संधी मोदी सोडत नाहीत. लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी देखील अंतराळातील सॅटेलाईट पाडला गेला तेव्हा त्यांनी नामी संधी हेरली आणि देशात सर्वात स्वस्त झालेला शब्द ‘सर्जिकल स्ट्राईक’ वापरून भारताने अंतराळात देखील सर्जिकल स्ट्राईक केल्याचं राष्ट्रीय भाषणात सांगितलं. विशेष म्हणजे अर्थव्यवस्था, बेरोजगारी आणि महागाई या विषयांवरून ते कधीच देशाला संबोधित करण्याचं धाडस करणार नाहीत. मात्र सध्या भारतीय लष्कर आणि वैज्ञानिक त्यांचे मार्केटिंगचे विशेष कारण झाले आहेत. कारण हे दोन्ही विषय भावनिक असल्याने विरोधकांना मोदींचा प्लान उमगला तरी टीका विरोधकांवरच होते हे मोदींना चांगलाच ठाऊक झालं आहे.
वास्तविक मोदींच्या एकूण राजकारणाचे निरीक्षण केल्यास, देशात मी पंतप्रधान झालो आणि लष्कर तसेच वैज्ञानिक दैदिप्यमान कामगिरी करत आहेत असाच मोदींच्या भाषणातील तोरा असतो. मात्र वास्तव हे आहे की सर्जिकल स्ट्राईक करणाऱ्या भारतीय लष्कराने त्यापेक्षाही मोठे म्हणजे दोन युद्ध जिंकण्याचे पराक्रम केले आहेत. तसेच इस्रो आणि डीआरडीओ’ने अनेक कठीण मिशन यशस्वी पार पाडले आहेत. मात्र मोदींच्या अशा भावनिक विषयावरून देशाला संबोधित करण्यामागे विशेष निशाण्यावर असतात ती २०-२५ वयोगटातील पिढी, ज्यांना याआधी भारताने किती युद्ध केली आणि इस्रोने किती यशस्वी मोहीम केल्या हे माहीतच नसल्याने, त्यांच्यासमोर केवळ वर्तमानकाळ ठेवून भूतकाळ पूर्णपणे लपवला जातो आहे. काँग्रेसच्या काळात चांद्रयान-१ ही यशस्वी मोहीम इस्रोने पार पाडली होती, याची मोदींना कदाचित नव्या पिढीला माहिती द्यावीशी वाटत नसावी. त्यामुळे हाच नवा भारत आहे ही संकल्पना नोयोजनबद्ध पणे त्यांच्या मनात बिंबवली जातं आहे. काल मोदी अभिनंदनाच्या नावाखाली थेट इस्रोच्या कार्यालयात तळ ठोकून होते आणि देशाला संबोधित करणार होते. मात्र मिशन असफल झालं आणि मोदींनी चाणाक्षपणे सर्व विषय भावनिक करून, त्यात देशाला देखील बांधून ठेवले आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी भूमिपूजनासाठी आज हजर झाले आहेत.
आता महत्वाच्या मुद्यावर बोलू म्हणजे, भारताचे चांद्रयान-एक हे यान २२ ऑक्टोबर २००८ रोजी चंद्राच्या दिशेने झेपावले. याच यानावर असलेल्या यंत्रणांच्या माध्यमातून नंतर चंद्रावर पाणी असल्याचा या शतकातील महत्त्वाचा ठरावा, असा शोधही लागला. मागील कित्येक वर्ष माणूस जे शोधत होता ते त्याला गवसले. यात भारताचे योगदान खूप मोठे होते. चांद्रयान एक ही फक्त भारतासाठीच नव्हे तर जागतिक पटलावरीलही महत्त्वाची घटना होती. अनंत अडचणींना सामोरे जात चांद्रयान झेपावले होते. भारतासारख्या देशात एखादा निर्णय झाला तरी तो प्रत्यक्षात यायला दीर्घकाळ वाट पाहावी लागते. नोकरशाहीचा अडथळा सर्वात मोठा असतो. या सर्वावर चांद्रयानाने मात केली होती.
अगदी अखेरच्या क्षणापर्यंत अडचणींशी झुंज सुरूच होती. २२ ऑक्टोबरला सकाळी ६.२२ वाजता उड्डाण होणार होते आणि आदल्या रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. समोर काही फुटांवरचेही दिसत नाही अशी अडचण होती, त्यामुळे प्रक्षेपकही दिसत नव्हता. त्यामुळे काऊंटडाऊनमध्ये मोठाच अडथळा आला होता. काऊंटडाऊनचे तीन तास वाया गेले, पण ‘इस्रो’चे तत्कालीन प्रमुख माधवन नायर यांनी मध्यरात्री नियंत्रण कक्ष गाठला. ‘इस्रो’मधील संशोधकांशी संवाद साधला. संशोधक म्हणाले की, पावसाचा वेग जरासा कमी झाला तरी सगळेजण वाया गेलेले तास अवघ्या दीड तासात भरून काढतील आणि झालेही तसेच; पहाटे अडीच वाजता पावसाचा वेग कमी झाला. त्यानंतरच्या अवघ्या दीड तासात आधीचे वाया गेलेले तीन तास भरून काढून चांद्रयान वेळेत झेपावले. काऊंटडाऊनमध्ये सर्व यंत्रणा व्यवस्थित काम करताहेत ना, याची चाचणी केली जाते म्हणून ते महत्त्वाचे होते. काही तासांचा अवधी असताना दीड तासात तीन तासांचा वाया गेलेला कालावधी भरून काढण्याची ही जगातील अशी एकमेवाद्वितीय घटना होती.
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था असलेल्या ‘नासा’चे तत्कालीन प्रमुख या उड्डाणाच्या वेळी जातीने हजर होते. त्यांनी उल्लेख केला होता की, ‘नासा’च्या एका मोहिमेचे बजेट म्हणजे ‘इस्रो’च्या वर्षभराच्या खर्चाएवढे असते. असे असतानाही भारतीय संशोधक यशस्वी मोहिमा राबवतात ही केवळ वाखाणण्यासारखी नव्हे तर अमेरिकन संशोधकांनी शिकण्यासारखी गोष्ट आहे. महत्त्वाचे म्हणजे ‘नासा’ आणि ‘युरोपिअन स्पेस एजन्सी’ने आपल्या काही यंत्रणा भारतीय चांद्रयानातून पाठविलेल्या होत्या. त्यातील एका यंत्रणेनेच चंद्रावरील पाण्याचा शोध घेतला, हे महत्त्वाचे. नामवंत अंतराळ संशोधन संस्थांनी भारतीय यानातून आपल्या यंत्रणा पाठविण्याचा निर्णय घेणे याला अनन्यसाधारण महत्त्व होते, तो भारतीय संशोधकांवर व्यक्त केलेला जाहीर विश्वास होता. भारताचे चांद्रयान चंद्रावर पोहोचणारच हा त्यामागचा विश्वास होता.
त्यापूर्वी अनेक राष्ट्रांनी चांद्रयान मोहिमा होती घेतल्या होत्या. पहिल्याच फटक्यात कोणाचेच चांद्रयान चंद्राच्या कक्षेत पोहोचलेले नव्हते, अगदी अमेरिका आणि रशियाचेदेखील. कारण चंद्राच्या कक्षेजवळ गेल्यानंतर योग्य अंशात वळण घेऊन चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणे महत्त्वाचे असते. बहुतांश मोहिमांना याच टप्प्यावर अपयश आले होते. भारत हा पहिल्याच फटक्यात चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश करणारा जगातील पहिलाच देश ठरला. असे अनेक मानाचे तुरे आपल्या शिरपेचात आहेत. मात्र त्याचे कौतुकच झाले नाही. आता त्या यशाला दशकपूर्ती झाली तरीही सर्जकिल स्ट्राइकच्या वर्षपूर्तीत गुंतलेल्या सरकारला चांद्रयानाची आठवणही नाही. चंद्रावर पाणी शोधणाऱ्यांचे विस्मरण सरकार आणि नागरिक दोघांनाही झाले आहे, याला काय म्हणावे?
दरम्यान, इस्रोने यापूर्वी अनेक यशस्वी आणि अयशस्वी मोहीम केल्या आहेत आणि त्यावेळी देखील भारत सरकार वैज्ञानिकांच्या पाठीशी ठामपणे उभं होतं. तत्पूर्वी ज्यादिवशी चांद्रयान २ च्या यानाने अवकाशात यशस्वी झेप घेतली होती, त्यानंतर मोदी सरकारने त्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांच्या पगारात कपात केल्याची वृत्त देखील प्रसिद्ध झाली होती. वास्तविक देशाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. बेरोजगारी आणि महागाईने देशातील जनतेला भेडसावून सोडले आहे. त्यामुळे देशातील नागरिकांचे आर्थिक संकटाच्या मुद्द्यावरून चित्त विचलित करण्यासाठीचं चांद्रयान-२ मोहीमेचा गाजावाजा केला जात आहे, असा गंभीर आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहेत.
चांद्रयान १ या इस्रोच्या २००८ मधील यशस्वी मोहिमेबद्दल अधिकुत माहिती खालील इस्रोच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यासाठी इथे क्लिक करा
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं