मुंबई मेट्रोच्या प्रकल्प शिळेवर मराठी डावलून हिंदीला स्थान; मोदींचे छोटे भाऊ सुद्धा शांत

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मेट्रो प्रकल्पांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात मोदी यांनी अनेक घोषणा केल्या. वांद्रे-कुर्ला संकुलातील कन्व्हेन्शन सेंटर येथील कार्यक्रमात मोदी यांनी गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) मेट्रो मार्ग १०, वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो मार्ग ११ आणि कल्याण ते तळोजा मेट्रो मार्ग १२ या तीन नवीन मार्गाचे भूमिपूजन केले. या तीन नवीन मार्गामुळे मेट्रोच्या जाळ्यात ४२ किमीची वाढ होईल.
भविष्यातील ३३७ किमी मेट्रो जाळ्याचे संचलन व नियंत्रण करणाऱ्या मेट्रो भवनाचेही भूमिपूजन मोदींच्या हस्ते करण्यात आले. तसेच मेट्रोच्या नव्या कोचचे आणि मेट्रो ७च्या मार्गावरील बाणडोंगरी स्थानकाचे उद्घाटन मोदी यांनी केले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील मेट्रोचा विकास पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने सुरू असल्याचे सांगितले. येत्या सहा वर्षांत तीन टप्प्यांत मेट्रोचे जाळे विस्तारण्यात येणार असून त्याचा फायदा एक कोटीहून अधिक प्रवाशांना होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सर्व मेट्रो प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबई आणि महानगर प्रदेशामध्ये एकात्मिक यंत्रणा तयार होणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्राच्या राजधानीतील मेट्रोच्या प्रकल्प शिळेवर मराठीला कोणताही स्थान न देता, सदर प्रकल्प शिळा हिंदीत असल्याचं दिसतं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा इतिहास पाहिल्यास ते वेगळा विदर्भ करण्याच्या आंदोलनात सक्रिय भाग घेणारे व्यक्ती आहेत आणि त्यामुळे त्यांना मराठी भाषेचं काही पडलं असेल असं वाटत नाही. राज्याची अस्मिता ही त्या राज्याची भाषा आणि संस्कृतवर अवलंबून असते.इतर राज्यातील नेते त्यांला कधीच महत्व देणार नाहीत. विशेष म्हणजे स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावर चकार शब्द ही बोलून दाखवला नाही आणि मोदींसमोर ते बोलायची हिम्मत देखील करणार नाहीत हे देखील वास्तव आहे.
विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण करताना भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. तसेच हे गुजरातमध्ये ते शिल्प साकारण्यासाठी मराठमोळ्या शिल्पकाराची मदत घेतली खरी, परंतु मोदींच्या गुजरातमध्ये त्या पुतळ्याजवळ ५ विदेशी भाषा आणि ५ भारतीय भाषांना स्थान देताना मराठीला पूर्णपणे डावलण्यात आलं होतं. तसेच गुजराती भाषा वगळून इतर भारतीय भाषांमध्ये व्याकरण्याच्या चुका झाल्याचे समोर आलं होतं आणि त्यावर तामिळ लोकांनी संताप व्यक्त केला होता. महाराष्ट्रात आल्यावर मोदी भाषणात ‘काय कसे आहात, सगळं मजेत ना’ अशी काही ठरलेली वाक्य बोलतात आणि लोकांना आकर्षित करतात. मात्र मराठी प्रति त्यांचा छुपा अजेंडा लपून राहिलेला नाही. महाराष्ट्रातील नेत्यांची नावं वापरून त्यांनी देशभर स्वतःची प्रतिमा निर्माण केली आणि नंतर त्याच्याच मुळाशी जाण्याच्या अघोषित योजना ते आखात असतात, मग त्यात शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीचे पवार हे सर्वच आले.
लोकार्पण झालेल्या या “स्टॅचू ऑफ युनिटीच्या” खाली देश-विदेशातील भाषांमध्ये लिहिलेल्या पाटीवर मोदींनी मराठी वगळून अनेक भाषांना स्थान दिले होते. मराठी आणि छत्रपती शिवाजी महाराज मोदींसाठी केवळ राजकारणाचं निमित्त असल्याची प्रतिक्रिया समाज माध्यमांवर त्यावेळी उमटली होती. स्टॅच्यू ऑफ युनिटी असे या पुतळ्याचे वर्णन मोदी यांनी करताना शिवरायांशी तुलना केली. मात्र, गुजरातला मराठीचे वावडे असल्याचे त्यावेळी दिसले होते.
विशेष म्हणजे पुतळ्याजवळील त्या नावाच्या पाटीमध्ये हिंदी, बंगाली, उर्दू, तमिळ आणि गुजराती भाषेंसह रशियन, फ्रेंच आणि चीनच्या भाषांचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. महत्वाकांक्षी राफेल करारानंतर फ्रेंच भाषातर मोदींच्या विशेष आवडीची झाल्यासारखे चित्र आहे आणि त्यामुळे फ्रेंच भाषेला त्यात विशेष स्थान आहे. मात्र, शेजारच्या राज्यातील मराठी भाषेचा समावेश नसल्याने समाज माध्यमांवर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तसेच या पाटीमध्ये तमिळ आणि बंगाली भाषेतील नावात सुद्धा व्याकरण्याच्या चुका झाल्याने समाज माध्यमांवर त्या भाषेवर प्रेम करणारी जनता टीका करताना दिसत होती.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं