भाजप-सेना युतीची चर्चा काही दिवसांपूर्वीच थांबल्याचे वृत्त; मनसेच्या देखील बैठका सुरु

मुंबई : विधानसभा निवडणुकीत जागावाटपात शिवसेनेला १४४ जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं वक्तव्य करुन दिवाकर रावतेंनी खळबळ उडवून दिली आहे. शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते काल एका खाजगी वृत्तवाहिनीच्या मुलाखत त्यांनी युतीबद्दलच्या शक्यता आधीच वर्तवल्या आहे.
लोकसभा निवडणुकीआधी युती करताना भारतीय जनता पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत नाणारचा प्रकल्प इतरत्र हलवण्याचं, तसेच विधानसभेला शिवसेनेला १४४ म्हणजेच निम्म्या जागा देण्याचं आश्वासन त्यावेळी भाजपने दिलं होतं. त्यामुळे जर शिवसेनेला १४४ जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, युतीची चर्चा मागील काही दिवसांपासून थांबवल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांकडून मिळाली आहे. तत्पूर्वी युवासेना प्रमुख आणि शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असलेले आदित्य ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना लोकसभा निवडणुकीपूर्वी युतीत जागावाटपाचा जो फॉर्म्युला ठरला आहे, त्यात शिवसेना विश्वासघात करणार नाही असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपा युतीत काही आलबेल नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
शिवसेना ५०-५० च्या फॉर्म्युल्यावर ठाम राहिल्याने युतीची चर्चा पुढे सरकली नाही. शिवसेनेला जास्तीत जास्त १२० जागा सोडण्याचा भाजपाचा इरादा आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे मी पुन्हा येणार यातून पुढील मुख्यमंत्री भाजपाचाच असणार हे संकेत दिले आहेत. त्यामुळे जागावाटपाबाबत शिवसेना-भाजपाचं ठरलंय असं म्हणणारे नेते आता युतीबाबत वरिष्ठ निर्णय घेतील असं सांगून उत्तर देणं टाळत आहे. दरम्यान, एकीकडे युती होणारच अशी शेवटपर्यंत चर्चा रंगवून प्रसार माध्यमांमध्ये उत्सुकता ताणून धरण्याची २०१४ मधील रणनीती भाजप-सेनेने यावेळी देखील कायम ठेवली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं देखील त्यावर बारीक लक्ष असल्याचं समजतं. त्या अनुषंगाने मनसेने देखील जोरदार आखणी सुरु केल्याचे वृत्त आहे आणि त्यासंबधीत जिल्हा निहाय बैठका सुरु आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं