मराठी माणसासोबत जाण्याची मनसेची भूमिका आम्हाला पटत नाही: प्रकाश आंबेडकर

मुंबई: विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत जाणार नसल्याचं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. मराठी माणसासोबत जाण्याची मनसेची भूमिका पटत नसल्याचेही ते म्हणाले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
विधानसभा निवडणुकीदरम्यान मनसेला सोबत घेणार नाही. तसंच या निवडणुकांसाठी मुस्लीम समाजाचे 25 उमेदवार देणार असल्याचे आंबेडकर म्हणाले. यापूर्वीही त्यांनी आपली मनसेसोबतची भूमिका स्पष्ट केली होती. आम्ही राष्ट्रवादी आहोत. तसंच आम्ही मनसेसोबत जाणार नाही. आमचा दृष्टीकोन प्रादेशिकही नाही आणि धार्मिकही नसल्याचे ते म्हणाले होते.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिगणात प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी उतरला असून, येत्या दोन दिवसात आंबेडकर आपले उमेदवार जाहीर करणार आहेत. मात्र मनसेला सोबत घेणार नाही असे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मुंबई ही मराठी माणसाची ही मनसेची भूमिका आपल्याला पटत नाही असे सांगत मनसेला सोबत घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच नेते चांगले असले तरी त्यांना सोबत घेणार नाही असे त्यांनी सांगितले. तसेच विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ने इतर पक्षांशी आघाडी करण्यासाठी कोणतेही दरवाजे बंद केले नाहीत आमचे दरवाजे खुले आहेत मात्र आता काँग्रेस सोबत आमचे जमणार नाही, असा युक्तिवाद देखील त्यांनी केला.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं