मोदींचा पाकिस्तान द्वेष मतांसाठी; नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक कसा चालतो? - धनंजय मुंडे

बीड: नाशिमध्ये झालेल्या महाजनादेश यात्रेच्या समारोप सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पाकिस्तानची स्तुती करत असल्याचा आरोप केला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार हरकत घेतलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पवारांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढत असल्याचं प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आधीच दिलं आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय संविधान पूर्णपणे लागू करण्यात आले. यामध्ये विरोधक राजकीय स्वार्थ शोधत आहेत. या निर्णयात संपूर्ण देश एकजूट असूनही काँग्रेस, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचे वर्तन मात्र वेगळे आहे. राष्ट्रहित सोडून विरोधकांची विधाने दहशत पसरविणाऱ्यांसाठी अपप्रचाराचा साधन बनत आहेत. काँग्रेसचा संभ्रम समजता येईल. परंतु, शरद पवार यांच्यासारखा अनुभवी नेता काही मतांसाठी चुकीची विधान करतो, तेव्हा दु:ख होते. त्यांना शेजारील देश चांगला वाटतो, तेथील सरकार कल्याणकारी वाटत असले तरी संपूर्ण जगाला दहशतवाद्यांचे उगमस्थान कुठे आहे, हे ज्ञात असल्याचे नमूद केले.
दरम्यान यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मोदींना पाकिस्तानच्या राजकारणावरून जोरदार टोला हाणला आहे. धनंजय मुंडे म्हणाले की, ‘फक्त मतांसाठी पाकिस्तान विरुद्ध बोलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशप्रेम बेगडी आहे. पाकिस्तानविषयी इतका द्वेष असताना मोदींना त्यांच्या सरकारनेच पाकिस्तानमधून आणलेला कांदा आणि साखर कशी चालते? नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक कसा चालतो?
फक्त मतांसाठी पाकिस्तान विरुद्ध बोलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशप्रेम बेगडी आहे. पाकिस्तानविषयी इतका द्वेष असताना मोदींना त्यांच्या सरकारनेच पाकिस्तानमधून आणलेला कांदा आणि साखर कशी चालते? नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक कसा चालतो? @PMOIndia pic.twitter.com/aEcA0IlGcd
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) September 19, 2019
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं