राणे म्हणतात वाघाची शेळी-मेंढी झाली; तर धनंजय मुंडे म्हणतात ही कुत्र्यासारखी अवस्था

मुंबई: विधानसभा निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे राजकीत आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झडताना दिसत आहे. आता तर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. राजकारणात शिवसेनेची अवस्था ही कुत्र्या सारखी झाली आहे, एक गोष्ट सांगून धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे.
जालना येथील सभेत धनंजय मुंडे यांनी भाजप आणि शिवसेनेवर कडाडून टीका केली.त्यांनी भाजपकडून राज्यात करण्यात आलेल्या विकासकामांचा पर्दाफाश केला. यावेळी व्यासपीठावर खुद्द पक्षाध्यक्ष शरद पावरही उपस्थित होते.
आदरणीय @PawarSpeaks साहेबांच्या उपस्थितीत जालनामध्ये भव्य साभा झाली. तरुणांना रोजगार नाही, कारखाने, कंपन्या बंद पडत आहेत असा नकारात्मक सूर लोकांच्या मनी जाणवला. हे सरकार बरखास्त केल्याशिवाय आता आपल्याला शांत राहायचं नाही. @NCPspeaks pic.twitter.com/LDZKE7KMM7
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) September 20, 2019
बाळासाहेब ठाकरे होते, तोपर्यंत शिवसेना ही शिवसेना होती. पण, आता शिवसेनेच्या आमदारांमध्ये वैचारिक नीतिमत्ता उरलेली नाही. मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होत असताना महापालिकेत टक्केवारी घेऊन कामे केली जात आहेत. पैसे देऊन आमदार, महापौर, नगरसेवक होता येते, हे शिवसैनिकांनाही आता माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेचा वाघ आता राहिलेला नसून, शेळ्या-मेंढ्या झाल्या आहेत, अशी घणाघाती टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी केली. भाजप प्रवेशासाठी शिवसेनाच आडकाठी आणत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं