सातारा लोकसभा पोटनिवडणुक विधानसभेसोबत अचानक जाहीर झाल्याने चर्चा रंगली

सातारा: देशातील अनेक ठिकाणी पोटनिवडणुका होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. परंतु सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा मात्र केली नव्हती. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसोबतच ही पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे या जागेसाठीही २१ ऑक्टोबरला मतदान होईल आणि २४ ऑक्टोबरला मतमोजणी होईल.
निवडणूक आयोगाने एक पत्रक काढून सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीसोबतचं होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे उदयनराजेंना मोठा दिलासा मिळाला आहे. उदयन राजे यांनी जेव्हा भाजप प्रवेश केला तेव्हा विधानसभा निवडणुकीच्यावेळी लोकसभेची पोटनिवडणूक घेण्यात यावी अशी मागणी केली होती.
साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर साताऱ्यासह इतर भागातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. ‘सर्वांचा विरोध असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंना तिकीट दिलं. जनतेनंही उदयनराजेंच्या बाजूने कौल दिला. मग त्यांनी आता अवघ्या तीन महिन्यात पक्ष का सोडला,’ असा प्रश्न राष्ट्रवादीकडून विचारला जात आहे.
मात्र मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम शनिवारी जाहीर केला. त्यावेळी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीबाबत भाष्य केलं नव्हतं. त्यामुळे पडद्यामागून काही हालचाली झाल्या का? याची चर्चा आता सुरु झाली आहे. मात्र २१ ऑक्टोबर ही पोटनिवडणूक होणार असल्याने साताऱ्याचा खासदार दिवाळीपूर्वी ठरणार हे निश्चित झालं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं