‘तेल लावलेला पैलवान’ हाताला लागलाच नाही; राज यांचं ते भाषण आज खरं ठरलं

मुंबई: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज, शुक्रवारी दुपारी दोन वाजता स्वत:हून अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील बॅलार्ड पियर येथील कार्यालयात हजर होणार होते. मात्र, चौकशीसाठी अद्याप समन्स बजावलेले नसल्याने पवार यांना ईडी कार्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता कमीच होती. या सगळ्या घडामोडींमुळं मुंबईत तणावाची परिस्थिती होती.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील कार्यालयात शुक्रवारी स्वत:च उपस्थित राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले होते. त्यामुळे आता ‘ईडी’समोरच पेच निर्माण झाला होता. आज दुपारी दोनच्या सुमारास ते ईडीच्या कार्यालयात पोहोचणार होते. परंतु ‘ईडी’ त्यांना कार्यालयात प्रवेश नाकारण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली होती. तसंच खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी कुलाबा, कफ परेड, मरीन ड्राइव्ह, आझाद मैदान, डोंगरी, जे. जे. मार्ग, एमआरए मार्ग या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश दिले होते.
राज्य शिखर बँकेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर ईडीने बँकेच्या इतर पदाधिकाऱ्यांसोबतच शरद पवार यांच्यावरही गुन्हा दाखल केला. त्यामुळे पवारांची देखील ईडी चौकशी होणार हे निश्चिच झालं. मात्र, ‘पुढचा महिनाभर मी राज्यात प्रचार करणार असल्यामुळे २७ सप्टेंबरलाच ईडीच्या कार्यालयात स्वत: हजर राहून त्यांचा ‘पाहुणचार’ मी घेणार आहे’, असं शरद पवारांनी जाहीर केलं. पण आता हा ‘पाहुणचार’ ईडीच्या कठोर चौकशीचा नसून फक्त शिष्टाचाराचा भाग म्हणून केला जाणारा पाहुणचार ठरणार असल्याने ईडीची फजिती होणार हे निश्चित होतं. शरद पवारांची चौकशी दिवाळीनंतरच केली जाणार असून आत्ता फक्त शिष्टाई म्हणून त्यांचा ईडीमध्ये सामान्य पाहुणचार केला जाईल, असं ईडीनं ठरवल्याचं प्रसार माध्यमांच्या हाती वृत्त देण्यास सुरुवात केली.
वास्तविक, मागील दोन महिन्यांत पहिल्यांदाच शिवसेना-भाजप युतीच्या यात्रांच्या चर्चेऐवजी विरोधी पक्षाच्या कुठल्या नेत्यांचं नाव इतक्या चर्चेत आल्याचं पाहायला मिळत आहे. वयाच्या ८०व्या वर्षी देखील एकहाती राष्ट्रवादीचा वारू फिरवण्यासाठी राज्यभर दौरे, भेटीगाठी करताना शरद पवार दिसत आहेत. पक्षातले अनेक दिग्गज नेते आणि मोठे चेहरे भाजप किंवा शिवसेनेत दाखल होत असताना उरलेल्या नेतेमंडळींमागे तपाससंस्थांच्या चौकशीचा ससेमिरा लागला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला नवी उभारी देण्यासाठी पवारांनी शिवसेना-भाजपला शिंगावर घेण्याची तयारी चालवली होती. त्यातच त्यांचंही नाव ईडीच्या यादीत आल्यामुळे सत्ताधारी गोटात आनंदाचं वातावरण दिसत असतानाच भाकरी फिरली आणि सेना-भाजप युतीच्या जागी सगळीकडे चर्चा सुरू झाली ती शरद पवारांची रंगली असून त्याला भावनिक किनार मिळत असल्याचे दिसले.
त्यानंतर बुचकळ्यात अडकलेल्या ईडीने तूर्तास कोणत्याही चौकशीची गरज नसून आवश्यकता असल्यास चौकशीसाठी बोलवण्यात येईल, असा ईमेल ईडीकडून शरद पवार यांना पाठवला. तसंच त्यांनी ईडीच्या कार्यालयात जाऊ नये यासाठी मनधारणी करण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनाच त्यांच्या घरी पाठवलं. त्यानंतर काही वेळाने शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आपण तूर्तास ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब केला असल्याची माहिती दिली. तसंच यानंतर आपण पुण्यात पूरग्रस्तांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याचे ते म्हणाले.
मागील २-३ दिवसांपासून सत्ताधाऱ्यांनी समाज माध्यमांचा वापर करून वातावरण तापवण्यास सुरुवात केली होती. एकूण दिवसभरात घडलेल्या घटनाक्रमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्याबद्दल म्हटलेलं ते विधान सत्यात उतरलं, कारण आज तोच ८० वर्षाचा तरुण अनुभवी राजकारणी अगदी ‘तेल लावलेला पैलवानासारखा’ सत्ताधाऱ्यांच्या हाताला लागला नाही आणि सत्ताधाऱ्यांचेच दिवसभरात हसे झाल्याचे पाहायला मिळाले.
शरद पवार यांच्या पंचाहत्तरीनिमित्त एनसीपीने आयोजित केलेल्या एका खास कार्यक्रमातील ते भाषण आज सत्यात उतरलेलं दिसलं. त्या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी होती. त्या भाषणात राज ठाकरे यांनी शरद पवार यांचा उल्लेख ‘तेल लावलेला पैलवान’ असा केला होता. त्याच शब्दांची प्रचिती आज महाराष्ट्रानं पुन्हा एकदा घेतली आहे असंच म्हणता येईल. १२ डिसेंबर २०१५ रोजी हा कार्यक्रम झाला होता.
त्यात राज ठाकरे म्हणाले होते, “मी अनेकदा शरद पवारांबाबत अनेक प्रकारचे मथळे वाचले आहेत. त्यातला अगदी सर्वांना माहित असलेला मथळा म्हणजे ‘तेल लावलेला पैलवान!’ हे मला आज पटतं आहे. हाताला लागत नाही, हाताला सापडत नाहीत याचा अर्थ काय? ते आज कळतं आहे. माफ करा मात्र एका आजाराच्या हातालाही पवारसाहेब लागले नाहीत. तिथूनही निसटले. हे साधंसुधं काम नाही. एक वेगळ्या प्रकारचं रसायन देवानं घडवलं आणि या महाराष्ट्राला ते दिलं. असा एकही विषय नाही की शरद पवार यांना त्याचा क्षणाचाही विचार करावा लागतो. प्रत्येक विषयातला त्यांचा अभ्यास प्रचंड गाढा आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं